शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

Maharashtra Assembly Speaker Election: "राहुल नार्वेकर कोणत्याही पक्षात गेले तर…" , सभागृहात अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 14:40 IST

Maharashtra Assembly Speaker Election: अजित पवार यांनी विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलताना जोरदार टोलेबाजी केली.

मुंबई: आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूने 164 तर प्रस्तावाच्या विरोधात 107 जणांनी मतदान केले. दरम्यान, या निवडीनंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नार्वेकरांवर जोरदार टोलेबाजी केली.

'नार्वेकर नेतृत्वाच्या जवळ जातात'अजित पवार पुढे म्हणतात की, ''मला एका गोष्टीचे कौतुक आहे, राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर पक्षनेतृत्वाच्या जवळ जातात. शिवसेनेत असताना त्यांनी आदित्य ठाकरेंना आपलंसं केलं. राष्ट्रवादीत आल्यावर त्यांनी मला आपलंसं केलं. आता भाजपात गेल्यावर देवेंद्र फडणवीसांना आपलंसं करून टाकलं. आता एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकरांना आपलंसं करून घ्यावं, नाहीतर त्यांचं काही खरं नाही,'' असं अजित पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला.

'मोदी लाटेत नार्वेकरांचा पराभव'पवार पुढे म्हणाले की, ''राहुल नार्वेकर आधी शिवसेनेत होते, त्यावेळी ते आदित्य ठाकरेंचे जवळचे सहकारी म्हणून काम करायचे, असे मी ऐकले होते. त्यांनी आदित्य ठाकरेंना कायद्याचे बरंच ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. आम्हीही अशा लोकांवर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे मला मावळ लोकसभा मतदारसंघात अभ्यासू व सुशिक्षित उमेदवार पाहिजे होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राहुल नार्वेकर यांना विनंती केली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार झाले. दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने पराभूत झाले,'' असंही अजित पवार म्हणाले.

'अध्यक्ष म्हणून उत्तम काम करतील'पवार पुढे म्हणाले, ''राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेचे सदस्यपद मिळाले. तेथे त्यांनी उत्तम काम केले. त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केले. आता ते विधानसभा अध्यक्ष म्हणूनही उत्तम काम करतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.''

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv Senaशिवसेना