शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"कापसाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे सी-2 वर आधारित हमीभाव द्यावा", विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 14:11 IST

Maharashtra Assembly Session 2024: स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे सी-२ वर आधारित हमीभाव द्यावा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज विधासभेत केली आहे.

मुंबई - शासनाने हमीभावाने कापूस खरेदी केला नाही. महाराष्ट्रातील एकूण किती कापूस उत्पादक आहेत, पणन महामंडळाने किती कापूस खरेदी केला आहे. किती कापूस खाजगी व्यापाऱ्यांनी  खरेदी केला आहे.  किती कापूस CCI  ने खरेदी केला आहे. खाजगी व्यापाऱ्यांनी कमी  दर  दिला असतांना अशा व्यापाऱ्यांवर शासनाने काय कारवाई केली आहे?  असा सवाल उपस्थित करत  स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे सी-२ वर आधारित हमीभाव द्यावा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधासभेत केली आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या चर्चेदरम्यान विजय वडेट्टीवार बोलत  होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात भारतीय कपास निगम  (सीसीआय) ची पुरेशी  केंद्र नव्हती. देशात कापूस आयात केल्यामुळे  व्यापाऱ्यांनी कापूस विकत घेतला नाही. त्यामुळे त्यात शेतकरी पिचला गेला. खाजगी व्यापाऱ्यांनी त्याचा फायदा घेतला. अनेकांच्या घरात कापूस पडून होता. सीसीआयच्या  दराप्रमाणे खरेदी होत नाही. अवैधरित्या बियाणांचा काळा बाजार सुरु आहे. भरारी पथकांकडून कारवाई करूनसुद्धा अवैध कापूस बियाणे राजरोसपणे राज्यात येतात. हमी भावाबाबत  केंद्र सरकारकडे बोट दाखवून दुर्लक्ष करू नका, असे ठणकावून सांगत मोदी सरकारनं उत्पादन  खर्चाच्या दीडपट  हमीभाव देण्याचा दावा केला होता यासंदर्भातील खुलासा करण्यात यावा, अशी मागणी  विजय वडेट्टीवार यांनी केली. 

कापसाच्या मुद्द्यावर सरकारला घेरत वडेट्टीवार म्हणाले की,  शासनाने हमीभाव देऊनही हमीभावाने पूर्ण कापूस खरेदी केला नाही.  एकूण कापूस उत्पादक शेतकरी  किती आहेत ? पणन  महामंडळाने किती कापूस खरेदी केला? खाजगी व्यापाऱ्याने किती कापूस खरेदी केला? असे सवाल त्यांनी सरकारला केले. सीसीआयने किती कापूस खरेदी केला आणि केंद्राकडे राज्य सरकारने स्वामिनाथन अहवालाप्रमाणे सी २ प्रमाणे हमीभाव द्यावा, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार