शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 11:41 IST

अंतर्गत वाद, दावेदारीही विलंबाचे कारण; मनोज जरांगे पाटील काय करणार याकडेही सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष

मुंबई : महायुतीमहाविकास आघाडी एकमेकांचे उमेदवार जाहीर होण्याची वाट पाहत असल्याने आणि त्याचवेळी दोघांचाही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याने सगळ्यांच्याच उमेदवार याद्या अडल्या आहेत. 

उमेदवारी अर्ज भरण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. २९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आतापासून उमेदवार जाहीर केले, तर बंडखोरी होईल, अशी भीती सगळ्याच मोठ्या पक्षांना वाटत आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर करण्याची घाई कशाला, असा विचार करून सगळेच पक्ष थांबले आहेत.  

महायुती व मविआमध्ये किमान ३० मतदारसंघ असे आहेत की, जिथे पहिले समोरच्यांनी उमेदवारी जाहीर करण्याची वाट पाहिली जात आहे. उमेदवारी नाकारल्याने आपल्याकडचे इच्छुक दुसरीकडे जातील, अशी शंका महायुती व मविआ या दोघांनाही वाटत आहे. त्यामुळेच उमेदवार जाहीर करण्याचे लांबणीवर टाकले जात आहे.  

जरांगेंच्या भूमिकेवर समीकरणे अवलंबून - मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील हे कोणता निर्णय २० ऑक्टोबरला घेतात, हे बघूनही काही मतदारसंघातील उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडी ठरवेल, असे म्हटले जात आहे. - जरांगे पाटील स्वत: उमेदवार लढवतील की, कोणाला पाठिंबा जाहीर करतील, याबाबत उत्सुकता आहे. त्यांच्या भूमिकेवर किमान ६०-७० विधानसभा मतदारसंघांतील समीकरणे अवलंबून असतील, असे मानले जात आहे.- त्यामुळेही महायुती व मविआ उमेदवार जाहीर करण्याची घाई करत नसल्याचे चित्र आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात जरांगे पाटील फॅक्टर महत्त्वाचा असेल. 

भाजपची पहिली यादी दोन दिवसांत? भाजपमध्ये दोन डझन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे.

ही रणनीती अंमलात आणण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या व्यक्तींना देण्यात आली आहे. त्यातील बहुतेकांनी उमेदवार यादी जाहीर करण्याची घाई करू नका, असे मत दिले आहे.

भाजपची पहिली यादी गुरुवारीच जाहीर केली जाणार होती, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ती अडली आहे. तरीही, आमची पहिली यादी दोन दिवसांत येईल, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभा