शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन! काँग्रेसला धक्का, उद्धवसेनेला फटका तर पवारांचा करिश्मा रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 05:28 IST

Vidhan Sabha Election Result 2024: काँग्रेसला मतदारांनी दिला मोठा धक्का, लोकसभेच्या निकालाने हादरून गेलेले अजित पवार विधानसभेला पूर्ण क्षमतेने, नव्या उमेदीने रिंगणात उतरले आणि विजयी झाले  

मुंबई - काँग्रेसचे बडे मोहरे या निवडणुकीत गळाले. पक्षाला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा दिग्गज नेत्यांना मतदारांनी पराभवाचा धक्का दिला आहे. राज्यात आमचीच सत्ता येईल इथपासून ते  काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वत:चाच मतदारसंघ वाचवू शकले नाहीत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अवघ्या २०८ मतांनी विजयी झाले आहेत. 

उद्धवसेनेचे वीस जागांवर समाधान 

निवडणुकीत उद्धवसेनेला मोठा फटका बसला आहे. पक्षाने जागावाटपात जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचल्या. तरीदेखील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पक्षाला फक्त २० जागांवर समाधान मानावे वागले आहे.  

शरद पवार यांचा करिश्मा रोखला 

शरद पवार यांचा करिश्मा या निवडणुकीत चालू शकला नाही, असे या निकालांवरून दिसून येते. सहजी हार न मानणारे थोरले पवार या निकालांनी चांगलेच बॅकफूटवर आल्याचे दिसते. पुतण्याच्या गटाचे आव्हान झेलत त्यांनी १० जागा मिळाल्या. 

जनतेने अजित पवार यांनाही भरभरून मतांचे दान दिले आहे. लोकसभेच्या निकालाने हादरून गेलेले अजित पवार विधानसभेला पूर्ण क्षमतेने, नव्या उमेदीने रिंगणात उतरले आणि विजयी झाले. अजित पवार त्यांच्या पद्धतीने निवडणुकीची व्यूहरचना केली. गुलाबी जॅकेटवर टीका झाली. पण सगळे अंदाज खोटे ठरवत त्यांनी बाजी मारली.

तमाम बहिणींनी दिले विजयाचे गिफ्ट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला विकासकामे व उत्तम कारभारामुळे विजय मिळाला आहे. महायुती महाराष्ट्राच्या विकासासाठी असेच उत्तम काम करत राहील. महायुतीला विजयी केल्याबद्दल महाराष्ट्रातील मतदारांचे विशेषत: युवक व महिलांचे मी आभार मानतो. त्यांनी महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. ‘जय महाराष्ट्र’. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान  

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत अनपेक्षित निकाल लागले आहेत. या निकालांचे आम्ही तपशीलवार विश्लेषण करणार आहोत. झारखंडमध्ये झामुमोप्रणित आघाडीला मिळालेल्या विजयाचे आम्ही स्वागत करतो. जल, जंगल, जमीन व राज्यघटना यांच्या रक्षणासाठी झारखंडमधील जनतेने आमच्या आघाडीला कौल दिला. वायनाडमधील मतदारांनी प्रियांका गांधींवर विश्वास दर्शविला याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसBJPभाजपा