शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 05:44 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघही या नावासाठी अनुकूल, फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री पद द्यावे, यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उत्सुक आहेत.

हरीश गुप्तानवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय आणि महायुतीने दणदणीत विजय मिळविल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्यंत उत्सुक दिसत आहे.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधित सर्वांशी चर्चा करतील आणि यावर अंतिम निर्णय घेणार आहेत, असे भाजपमधील सुत्रांनी सांगितले. २०२२मध्ये पंतप्रधान मोदी यांनीच महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव निश्चित केले होते. तर, उपमुख्यमंत्रिपदी फडणवीस यांची वर्णी लागली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री पद द्यावे, यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उत्सुक आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली संपूर्ण ताकद भाजपच्या मागे उभी केली होती. घरोघरी प्रचाराशिवाय ६० हजारांहून अधिक कोपरा सभा घेतल्या. त्यामुळेच लोकसभेत झालेले नुकसान यंदा भरून काढता आले. 'महायुतीच्या विजयाचे मॉडेल' भाजपाला विशेषत: दक्षिणेकडील राज्यांमध्ये झेप घेण्यास मदत करू शकते.  राष्ट्रवादी काँग्रेसलाही (अजित पवार) केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. परंतु, यासाठी थोडा वेळ लागू शकतो. कारण राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेना यांच्या पराभवानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होऊ शकते.

...तर भाजपच्या अध्यक्षपदाची माळ?

या दणदणीत विजयाने फडणवीस यांचा आलेख गगनाला भिडला असून, त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. जर मुख्यमंत्रिपद शक्य झाले नाही, तर देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नवे अध्यक्ष असू शकतात.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीMahayutiमहायुतीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ