शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 06:03 IST

Vidhan Sabha Election Result 2024: लोकसभेच्या निकालाने आलेली निराशा झटकण्याचे काम सुरु झाले. ग भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव या दोन दिग्गज केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात आले.

मुंबई - लोकसभेला पार कोमेजलेले कमळ विधानसभेला असे काही फुलले की पंजा, मशाल आणि तुतारीला धक्क्यामागून धक्के बसले. भाजपचे कार्यकर्ते पाच महिन्यांपूर्वीच्या दणक्याने पार नाऊमेद झालेले होते. आता विधानसभेला आपले काहीच खरे नाही अशा भीतीने त्यांना ग्रासले होते. मात्र शनिवारच्या निकालाने कमळ फुलले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची संपूर्ण यंत्रणा अत्यंत गतिमान केली. त्यांनी राज्य पालथे घातले. लोकसभेच्या निकालाने आलेली निराशा झटकण्याचे काम सुरु झाले. ग भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव या दोन दिग्गज केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात आले. मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणातून प्रभावी नेत्यांची कुमक जिल्ह्याजिल्ह्यात गेली आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चार्ज्ड् करणे सुरू झाले.

मुख्यमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्री करण्यात आलेले आणि नंतर त्यातही वाटेकरी आणले गेलेले देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि रा.स्व.संघाच्या शीर्ष नेतृत्वाने सांगितले. फडणवीसांनी पद्धतशीरपणे नियोजन सुरु केले. त्यातच हरियाणात अशक्यप्राय वाटणारा विजय मिळाला. हरियाणात आपण जिंकू शकतो तर महाराष्ट्रात का नाही अशी चेतना कार्यकर्त्यांमध्ये टाकली गेली, त्याने उत्साह वाढला.  केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांच्या लाभार्थींपर्यंत भाजपचे हजारो कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी मतदानासाठी आवाहन केले. पक्षाचे जेवढे सेल, आघाड्या आहेत त्याचे प्रमुख पदाधिकारी हे गेले दोन महिने घरीच गेले नाहीत. नियोजनबद्ध यंत्रणेने विजय साकार केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे