शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

"निदान सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवा"; शिंदेंनी शाह यांच्याकडे केलेली मागणी, उत्तर आले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 09:25 IST

Eknath Shinde Maharashtra CM Politics: मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत कसोशीने प्रयत्न केले होते, असे समोर येत आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हे आज ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत कसोशीने प्रयत्न केले होते, असे समोर येत आहे. यासाठी त्यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निदान पहिल्या सहा महिन्यांसाठी तरी मला मुख्यमंत्री बनवा अशी कळकळीची विनंती केल्याचे समोर येत आहे. 

महायुतीला प्रचंड बहुमत असले तरी ११ दिवस उलटूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरविता आलेला नाही. यामागे शिंदेंनी आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून केलेले प्रयत्न कारण ठरले आहेत. शिंदेंच्या मागण्यांमुळेच भाजपाला मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करता आलेले नाही. बहुमताच्या जवळ जागा निवडून आल्याने भाजपाला मुख्यमंत्री पद कोणासाठी सोडायचे नाहीय. तर शिंदेंनाही आपल्या नेतृत्वात एवढे बहुमत मिळाले असताना मुख्यमंत्री पद सोडायचे नव्हते. यामुळे भाजपाने शिंदेंचा दावा फेटाळला असून भाजपचाच मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

भाजप पुन्हा मुख्यमंत्री बनविण्यासाठी तयार होत नसल्याचे पाहून शिंदेंनी आधी भाजपाला बहुमत आले तर तुम्हालाच मुख्यमंत्री करणार असा भाजपाने शब्द दिलेला याची आठवण करून दिली. यावर भाजपाने तुम्ही भाजप अध्यक्षपदावर असल्याचा विचार करा आणि सांगा, असे उत्तर दिले. यानंतर शिंदेंनी जास्त नको निदान पहिल्या सहा महिन्यांसाठी तरी मला मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली. 

यावर भाजपाच्या हायकमांडने तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री केले तर चुकीचा पायंडा पडेल असे सांगितले. तसेच सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री करण्याची कोणतीही सिस्टीम नाही. हा चुकीचा निर्णय असेल आणि प्रशासनावरही याचे विपरित परिणाम होतील असे सांगत शिंदेंची ही देखील मागणी फेटाळण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाने या बैठकांशी संबंधीत राजकीय नेत्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. 

या नेत्यानुसार ही बैठक २८ नोव्हेंबरला झाली होती. यामध्ये शिंदेंनी आपल्याला मुख्यमंत्री करावे अशी मागणी लावून धरली होती. यावर भाजपा नेतृत्वाने शिंदेंना एकाच वाक्यात मुख्यमंत्री पदाची मागणी नको, असे सांगितले. तुम्ही स्पष्ट बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री पदाचा दावा सोडाल का, असा सवाल भाजपाने विचारला होता, यावर शिंदे शांत राहिल्याचे या नेत्याने सांगितले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाहmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना