शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

"राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील आणि कधी…’’, त्या विधानावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 17:29 IST

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही  राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील तर कधी टॉप गिअर टाकतील, याचा नेम नसतो', असे संजय शिरसाट म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गट आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्यातच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह घेण्यावरून राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटावर टीका केली होती. त्यावरून आता शिंदे गटातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही  राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील तर कधी टॉप गिअर टाकतील, याचा नेम नसतो', असे संजय शिरसाट म्हणाले.

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, ते राज ठाकरे आहेत. ते कधी रिव्हर्स गिअर घेतील आणि कधी टॉप गिअर टाकतील याचा नेम नसतो. म्हणून ते त्यांची भूमिका त्यांच्या मर्जीने घेतात. कुणी सांगितलं म्हणून भूमिका घेतली असं त्यांचं नसतं. शिवसेनाप्रमुख जशा भूमिका घ्यायचे, तसे बेछूटपणे भूमिका घेण्याचा राज ठाकरे यांचा स्वभाव आहे. त्या स्वभावाला अनुसरून त्यांनी घेतलेली ती भूमिका आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.

दरम्यान, काल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणावरही भाष्य केलं होतं. पक्षाचे नाव व चिन्ह घेणं योग्य नसल्याचे म्हणत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टोला लगावला होता. लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा तुमच्या हाती लागणार नाही हे मी त्यांना सांगितलं होतं. हे सांगून हट्टा पायी जागा पाडायच्या असतील तर पाडून घ्या. ती जर जागा आम्ही लढलो असतो १०० टक्के चित्र वेगळं असतं. त्यानंतर ते सांगतात की तुम्ही आमच्या निशाणीवर निवडणूक लढवली पाहिजे. कसं आहे मी लोकांमधून कमावलेली निशाणी आहे ढापलेली नाही. इतक्या वर्षांच्या निवडणुकीच्या प्रवासात मिळालेली निशाणी आहे. ती निशानी लोकांच्या मतदानातून मिळालेली आहे कोर्टातून आलेली नाही," असं राज ठाकरे म्हणाले होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Shirsatसंजय शिरसाटRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना