शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"विदर्भात आमची ताकद जास्त, या भागातील ९९ टक्के जागा आम्ही लढवणार’’, काँग्रेसचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 14:10 IST

Maharashtra Assembly Election 2024: नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) विदर्भामध्ये विशेष यश मिळावलं होतं. या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पूर्व विदर्भातील ९९ टक्के जागांवर लढेल, असा दावा काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी (Abhijit Wanjari) यांनी केला आहे.

नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिलालं होतं. तसेच काँग्रेसच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ झाली होती. काँग्रेसलाविदर्भामध्ये विशेष यश मिळावलं होतं. या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, विदर्भातील अधिकाधिक जागा लढण्याचा मानस काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचदरम्यान,  पूर्व विदर्भामध्ये काँग्रेसची ताकद सर्वात जास्त आहे. त्यामुळे काँग्रेस पूर्व विदर्भातील ९९ टक्के जागांवर लढेल, असा दावा काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजित वंजारी यांनी सांगितले की, विदर्भातील नागपूर विभागातील ५ जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे आहे. या भागातील काँग्रेसच्या लोकसप्रतिनिधींची मतं जाणून घेण्याचं काम सध्या आमच्याकडून सुरू आहे. या भागात पक्षाची ताकद किती आहे, बूथ लेव्हलला कार्यकर्ते किती आहेत, हे जाणून घेण्याची जबाबदारी पक्षाने माझ्याकडे सोपवली आहे. या भागात काँग्रेस पक्षाची असलेली ताकद पाहता ९९ टक्के जागा आम्हाला मिळाव्यात, अशी आग्रहाची मागणी आम्ही करणार आहोत, असे अभिजित वंजारी म्हणाले. 

संपूर्ण विदर्भाबाबत विचारलं असता अभिजित वंजारी पुढे म्हणाले की, अमरावती विभागाचा मला तेवढा अभ्यास नाही. मात्र नागपूर विभागाबाबत म्हणाल तर ९९ टक्के जागा ह्या काँग्रेसने लढाव्यात, असं माझं मत आहे. तशा पद्धतीचा अहवाल मी देणार आहे. तसेच सर्व्हेमध्ये ज्या नेत्याचं नाव येईल, त्या नेत्याला पक्ष उमेदवारी देणार आहे, असे संकेतही अभिजित वंजारी यांनी दिले. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीने विदर्भात जोरदार मुसंडी मारली होती. तर पूर्व विदर्भात काँग्रेसला विशेष यश मिळालं होतं. येथील ५ पैकी ४ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. तर एका जागेवर भाजपाला विजय मिळाला होता. 

टॅग्स :congressकाँग्रेसVidarbhaविदर्भAbhijit Wanjariअभिजीत वंजारीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024