शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 12:58 IST

Maharashtra Assembly Election 2024 Sushma Andhare And Jayashree Thorat : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे.

संगमनेरच्या धांदरफळ बुद्रूक येथे युवा संकल्प मेळाव्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची सभा पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर टीका केली. सुजय विखे हे मंचावर असतानाच वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केलं. देशमुखांच्या या विधानानंतर संगमनेर तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे, ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांना शिक्षा मिळायला हवी असं जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे. याच दरम्यान आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले करणे यातून पुरुषी अहंकाराने पछाडलेली सरंजामी मानसिकता दिसते" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "जयश्री थोरात, स्नेहल जगताप,सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे ही नावे निमित्त मात्र आहेत. सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले करणे यातून पुरुषी अहंकाराने पछाडलेली सरंजामी मानसिकता दिसते. बाईच्या हातात फक्त पाळण्याची दोरी असावी राजसत्तेची दोरी तिने कधी हातात घेऊच नये हा विचार मनुवादी आहे" असं सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

धांदरफळ येथील सभेत वसंतराव देशमुख यांनी अश्लाघ्य भाषेत जयश्री थोरात यांच्याबाबत भाष्य केलं. भाषणानंतर सभेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुजय विखे बॅनर फाडत आपला निषेध नोंदवला. तर सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर जयश्री विखे यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी कारवाईसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. त्यानंतर बोलताना जयश्री थोरात यांनी सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sushma Andhareसुषमा अंधारेSujay Vikheसुजय विखेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातShiv Senaशिवसेनाnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकSangamnerसंगमनेर