शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 17:35 IST

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिले आहे. माझ्या मतदारसंघामध्ये शरद पवार फॅक्टर चालणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. 

एकीकडे महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमधील जागावाटपाच्या चर्चांचं गुऱ्हाळ संपण्याचं नाव घेत नसताना दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात लोकसभा निवडणुकीनंतर काहीशा बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही आपल्या ३८ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात  सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिले आहे. माझ्या मतदारसंघामध्ये शरद पवार फॅक्टर चालणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. 

सिन्नरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, माझा मतदारसंघ अत्यंत हुशार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. परंतु शरद पवार हे दिल्लीमध्ये असतात आणि माझ्या मतदारसंघातील प्रश्न हे राज्यातील आहेत. मला राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातला नेता हवा आहे. सध्या अजित पवारांएवढा सक्षम नेता प्रश्न सोडवण्यासाठी आहे, असं मला वाटत नाही. म्हणून मी जाणीवपूर्वक अजित पवार यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. शरद पवार यांना मानणारे लोकही माझ्यासोबत येतील आणि विकासासाठी, याची खात्री आणि विश्वास मला आहे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. 

यावेळी माणिकराव कोकाटे यांनी जातीपातीच्या राजकारणावरही टीका केली. ते म्हणाले की, ओबीसी, जात, धर्म, पैसा, या सर्व गोष्टी बोलण्यासाठी आहेत. काही संबंध नाही. मी स्वत: ओबीसी आहे. त्यामुळे ओबीसी, मराठा, इतर अल्पसंख्याक याचं कल्याण करणारे, असं कुणी कुणाचं कल्याण करत नाही. कुठलीही योजना आणली की ती संपूर्ण समाजासाठी असते. कुठल्याही एका समाजासाठी असत नाही असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, सिन्नरमध्ये माझ्यासमोर कुणाचंही आव्हान नाही आहे. सिन्नर तालुक्यात झालेला विकास, होणारा विकास, विकासाच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा कोण आणि कशा पूर्ण करू शकतो, हे सिन्नर तालुक्यातील जनतेला माहित आहे. त्यामुळे येथील निवडणूक फारशी अवघड आहे, असं मला वाटत नाही. मात्र निवडणुकीची एक प्रक्रिया असते त्यानुसार निवडणूक लढवावी लागणार आहे, असेही माणिकराव कोकाटे म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sinnar-acसिन्नरManikrao Kokateमाणिकराव कोकाटेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस