शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:55 IST

Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला दणदणीत विजय मिळवला असला तरी आता राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण यावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल, असा दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला दणदणीत विजय मिळवला असला तरी आता राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण यावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री बनवावे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचं मुख्यमंत्रिपद सोपवण्याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचंही एकमत झालं असून, लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होईल, असा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल, असा दावा केला आहे.

यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे करताना संजय शिरसाट म्हणाले की, माझ्या मते आमच्या पक्षाकडूनच मुख्यमंत्री झाला पाहिजे. कारण एकनाथ शिंदे यांनी मागच्या अडीच वर्षांत जे काही काम केलं आहे. त्या जोरावरच आम्ही निवडणुकीत उतरलो होतो. तसेच त्यांच्या चेहऱ्यावरच निवडणुका लढवल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना आणल्या होत्या, त्या जनतेला आवडल्या होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आणखी वेळ दिला पाहिजे. तसेच त्यांच्याकडून आणखी काम करून घेतलं पाहिजे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले की, जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं तरीही आम्हाला काही अडचण नसेल. जे नाव समोर येईल त्याचं आम्ही स्वागत करू.

तर भाजपाचे नेते विनय सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रिपदावरून कुठलाही वाद नसल्याचे सांगितले. तसेच महायुतीमधील तिन्ही नेते आणि भाजपाचे वरिष्ठ नेते लवकरच मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील जनतेला एक चांगलं आणि भक्कम सरकार मिळणार आहे. तसेच ते भक्कमपणे चालणार आहे, असे ही विनय सहस्रबुद्धे म्हणाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Chief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटMahayutiमहायुती