शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 13:56 IST

Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्षांकडून पुन्हा एकदा इव्हीएमविरोधात शंका उपस्थित केली जात आहे. त्यात आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही इव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी महायुतीला बंपर बहुमत मिळालं आहे. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीसह इतर पक्षांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून पुन्हा एकदा इव्हीएमविरोधात शंका उपस्थित केली जात आहे. त्यात आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही इव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांना या विधानसभा निवडणुकीत महायुतीने फसवल्याचा तसेच इव्हीएममुळेच महायुतीचा विजय झाल्याचा दावा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.

अविनाश जाधव विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून काही व्हिडीओ येत आहेत. ते पाहिले तर तुम्हाला कशा प्रकारे निकाल तयार करण्यात आले हे लक्षात येईल. आम्हाला एवढा वाईट निकाल लागेल, याची अपेक्षा नव्हती. हा निकाल आम्हाला मान्यच नाही आहे. आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी कोरोना काळात खूप काम केलं होतं. मात्र मागच्या दहा वर्षांपासून कुठेही न गेलेले आमदार लाख लाख मतांनी निवडून येतात, हे अशक्य आहे, अनाकलनीय आहे आणि मी खात्रीने सांगतो की, इव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती. या निकालंमध्ये ईव्हीएमची खूप मोठी भूमिका आहे, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला. 

यावेळी महायुतीच्या नेत्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना फसवल्याचा आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे हे विधानसभेच्या निकालांबाबत राज ठाकरे हे आपली भूमिका लवकच मांडतील. मात्र कार्यकर्ते म्हणून विचाराल तर अनेक मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांबाबत नाराजी होती. लोक ती नाराजी बोलून दाखवत होते, असं असतानाही लोकांनी भाजपाला मत दिलं असं वाटत असेल तर ती बाब खोटी आहे. राज ठाकरे यांनी परवा झालेल्या बैठकीत उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं. आता ते लवकरच आपली भूमिका मांडतील. तसेच त्यामधून महाराष्ट्रात काय घडलं, याची माहिती सर्वांना मिळेल, असेही अविनाश जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024EVM Machineईव्हीएम मशीनMNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवRaj Thackerayराज ठाकरेMahayutiमहायुती