शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात महायुतीची जोरदार मुसंडी, तब्बल ३३ जागांवर आघाडी, ठाकरेंना मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 12:56 IST

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील बहुतांश सर्वच भागात महायुतीला घवघवीत यश मिळालं असून, ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणातही महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार कोकणातील ३९ जागांपैकी ३३ जागांवर महायुतीने आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. राज्यातील सर्व २८८ जागांचे कल समोर आले असून, त्यामध्ये महायुतीने २२० जारांवर आघाडी घेत निर्विवाद बहुमत मिळवण्याच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश सर्वच भागात महायुतीला घवघवीत यश मिळालं असून, ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणातही महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार कोकणातील ३९ जागांपैकी ३३ जागांवर महायुतीने आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ३ जागांवर आघाडी  मिळाली आहे. त्याशिवाय इतर उमेदवार ३ जागांवर आघाडीवर आहेत.   सध्या हाती आलेल्या कलांनुसार कोकणातील ३९ जागांपैकी ३३ जागांवर महायुतीमधील घटकपक्ष आघाडीवर आहेत. तर केवळ ३ जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मिळाली आहे. तर ३ जागा इतरांच्या खात्यात जाताना दिसत आहेत.

कोकणातील मोठ्या आणि लक्षवेधी लढतींचा विचार करायचा झाल्यास लढतींचा विचार करायचा झाल्यास आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये वसईमध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर पिछाडीवर आहेत., पालघरमध्ये शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे आघाडीवर आहेत. डोंबिवलीत भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे. कळवा मुंब्रा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत.

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आघाडीवर आहेत. ऐरोलीमध्ये भाजपाचे गणेश नाईक आघाडीवर आहेत. श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांनी विजयी आघाडी मिळवली आहे. तर रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचे उदय सामंत यांनी आघाडी घेतली आहे. गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी आघाडी घेतली आहे.  कणकवलीत भाजपाचे नितेश राणे हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. तर सावंतवाडीमध्ये शिंदे गटाचे दीपक केसरकर हे आघाडीवर आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीkonkanकोकणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस