शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या रामटेकमध्ये मविआत बंडखोरी, काँग्रेसचे राजेंद्र मुळक आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 09:46 IST

Maharashtra Assembly Election 2024: रामटेकच्या जागेची अदलाबदली करण्याबाबत उद्धव ठाकरेंसोबतचे काँग्रेसचे सर्व प्रयत्न अपयशी ठररल्यानंतर रामटेकमध्ये सांगली पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता असून, येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले काँग्रेसचे राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) हे आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

विदर्भात शिवसेना ठाकरे गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या नागपूरमधील रामटेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. रामटेकच्या जागेची अदलाबदली करण्याबाबत उद्धव ठाकरेंसोबतचे काँग्रेसचे सर्व प्रयत्न अपयशी ठररल्यानंतर रामटेकमध्ये सांगली पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता असून, येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले काँग्रेसचेराजेंद्र मुळक हे आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

विदर्भातील अनेक जागांवरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये तिढा निर्माण झाला होता. त्यात नागपूरमधील रामटेकची जागा ठाकरे गटाकडे गेल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघ मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने येथून विशाल बरबटे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यामुळे येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले राजेंद्र मुळक हे नाराज झाले होते. त्यानंतर रामटेक विधानसभा मतदारसंघाऐवजी अन्य मतदारसंघाची अदलाबदली करण्याचा किंवा मुळक यांना ठाकरे गटातून लढवण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. राजेंद्र मुळक यांनीही उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या वाटाघाटी यशस्वी ठरल्या नाहीत. त्यामुळे अखेर राजेंद्र मुळक यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान,  रामटेकमध्ये आशिष जयस्वाल हे विद्यमान आमदार असून, २०१९ मध्ये अपक्ष निवडून आलेल्या जयस्वाल यांना यावेळी भाजपानं उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे विशाल बरबटे आणि काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांचं मुख्य आव्हान असण्याची शक्यता आहे. आशिष जयस्वाल यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी यांचा २४ हजार ४१३ मतांनी पराभव केला होता.  दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून काँग्रेसच्या उमेदवाराला पावणे पाच हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे येथे महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत होतं. मात्र आता बंडखोरीमुळे येथील समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rajendra Mulakराजेंद्र मुळकramtek-acरामटेकcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी