शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:37 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्ता राखत 288 सदस्यीय विधानसभेत 230 हून अधिक जागा जिंकल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला आहे. यानंतर आता, या निवडणुकीतील आश्चर्यकारक पराभवाची कारणे समजून घेण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत सर्व सहकारी पक्ष एकत्रितपणे आत्मचिंतन करू, असे काँग्रेसने म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्ता राखत 288 सदस्यीय विधानसभेत 230 हून अधिक जागा जिंकल्या आहेत.

आश्चर्यकारक पराभव -या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडीला केवळ 46 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) महासचिव केसी वेणुगोपाल यासंदर्भात एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल “धक्कादायक” आणि “अविश्वसनीय” आहेत. “काय झाले हेच आम्हाला समजू शकत नाहीये. हा केवळ काँग्रेस पक्षाचाच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचा पराभव आहे. आम्हाला आधी नेमके काय झाले ते समजून घेऊ द्या.

हा संपूर्ण आघाडीचा पराभव - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात काही गडबड झाल्याचे शक्यता वाटते की? असे विचारले असता ते म्हणाले, पराभवानंतर लगेचच मी असा कोणताही आरोप करत नाही. पण, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आम्हाला मोठा धक्का बसला आहे. हे केवळ काँग्रेस पक्षाचेच अपयश नाही, तर संपूर्ण आघाडीचे अपयश आहे. यामुळे आम्ही एकत्र बसून एकत्रितपणे आत्मपरीक्षण करू 

महाराष्ट्रात महायुतीचा जय - निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार, या निवडणुकीत भाजपला 132 जागा, शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीतील, राष्ट्रवादी कँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 10, काँग्रेसने 16 तर शिवसेनेने (उद्धव बालासाहेब ठाकरे) 20 जागा जिंकल्या आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती