शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“अंतरवाली सराटी श्रद्धास्थान, बीडमधील सर्व जागा निवडून आणू”; बजरंग सोनावणे जरांगेंना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:06 IST

Maharashtra Assembly Election 2024: बीड जिल्ह्यातील सर्व जागांवर दावा करण्याचा आमचा अधिकार आहे. जास्तीत जास्त जागा आम्हाला नक्की मिळतील, असे बजरंग सोनावणे यांनी स्पष्टपणे सांगितले.

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीत भाजपा पाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. यातच आरक्षणावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अनेक नेते मंडळी, मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी गर्दी करताना दिसत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणे यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेतली. 

बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीबाबत माहिती दिली. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो. ही काही राजकीय भेट नाही. हे माझे श्रद्धास्थान आहे. म्हणून भेटीसाठी आलो. या भेटीत राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची होती, असे बजरंग सोनावणे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत माझ्या पक्षाची भूमिका काय, हा भाग वेगळा तसेच मनोज जरांगे यांची राजकीय भूमिका काय, हा भाग वेगळा आहे. त्यामुळे राजकीय चर्चा करायचा विषय नव्हता. इथूनच पुढे जात होतो,  म्हणून भेटायला आलो, असे बजरंग सोनावणे म्हणाले. 

बीडमधील सर्व जागा निवडून आणू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा मी खासदार आहे. बीड जिल्ह्यातील सहाही जागांवर दावा करण्याचा आमचा अधिकार आहे. परंतु, महाविकास आघाडीचा जो निर्णय असेल, त्यात एक दोन जागा इकडे, तिकडे जाऊ शकतात. उर्वरित जागा आमच्या पक्षाला मिळू शकतात. जास्तीच्या जागा आमच्या पक्षाला नक्की मिळतील. एखादी ठाकरे गटाला जाईल, एखादी काँग्रेसला जाऊ शकते. आज, उद्याकडे अंतिम निर्णय होईल. हा निर्णय झाला की, तुम्हाला कळेल. पण, जिल्ह्यातील सहाही जागा, मग आमच्या पक्षाच्या चार असतील, पाच असतील किंवा सहा असतील, त्या सगळ्या जागा निवडून आणण्यासाठी काम करू, असे बजरंग सोनावणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मंगळवारी रात्री शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे हे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. यात मंत्री उदय सामंत, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, भाजपा नेते सुरेश धस यांच्यासह अनेक नेते मंडळी, पदाधिकारी यांचा समावेश आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bajrang sonwaneबजरंग सोनवणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNCPराष्ट्रवादी काँग्रेस