शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:38 IST

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP AP) पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्याही दिवशी होण्याची शक्यता आहेत. त्यासाठी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोगाकडून घेतला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या मागणीबाबत माहिती देताना अनिल पाटील म्हणाले की, आमच्या पक्षाच्यावतीने शिवाजीरावा गर्जे आणि मी निवडणूक आयोगाकडे गेलो होते. महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यामध्ये झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही तिथे केली. उमेदवारांसाठी असलेली निवडणूक खर्चाची मर्यादा वाढली पाहिजे. तसेच आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करताना उमेदवाराला एकदा तरी विचारलं पाहिजे. महाराष्ट्रातील परिस्थिती आणि महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य असल्याने इथे एका टप्प्यात निवडणूक  घेतली तरी चालणार आहे, असे म्हणजे अनिल पाटील यांनी मांडले. 

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पुढील आठवडाभरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. २८८ सदस्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार की ही निवडणूक दोन ते तीन टप्प्यांपर्यंत लांबणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान,  २०१९ मध्येही महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही एकाच टप्प्यात झाली होती. त्यामुळे यावेळीही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात आटोपली जाईल, अशी शक्यता आहे.    

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान