शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

माघार, अश्रूसंताप अन् अंत्ययात्रा... नाट्यमय घडामोडींनी गाजला सोमवार; कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 06:55 IST

Maharashtra Assembly Election 2024 : उद्धवसेनेच्या उमेदवाराची छ.संभाजीनगरमध्ये माघार, लगेच दिला दुसरा पर्याय

मुंबई : सोमवारचा दिवस राज्याच्या राजकारणात नाट्यमय घटनांचा अनुभव देणारा ठरला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस  असून नेत्यांची लगबग आणि धावाधाव बघायला मिळणार आहे. बारामतीत उमेदवारी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री अजित पवार भावूक झाले.

औरंगाबाद मध्य मतदारसंघात उद्धव सेनेच्या उमेदवाराने माघार घेतली, दोन तासात नवीन उमेदवार दिला गेला. काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्याऐवजी शरद पवार गटाने पुत्र सलिल यांना उमेदवारी दिली. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलत मधुरिमा छत्रपती यांना संधी दिली. शिंदेसेनेने उमेदवारी नाकारलेले श्रीनिवास वनगा आणि त्यांच्या पत्नीने संतापाला वाट मोकळी करून दिली. लातूर शहरात एका अपक्ष उमेदवाराने स्वत:ची ‘अंत्ययात्रा’ काढली.

...अन् अजित पवारांचे डाेळे पाणावलेबारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा नारळ फोडला त्यावेळी भावूक होत लोकसभेला माझं चुकलं अशी कबुली देत ‘लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा’, अशी साद मतदारांना घातली. आई सांगत होती, माझ्या ‘दादा’च्या विरोधात कोणीही फॉर्म भरू नका...असे सांगताना त्यांनी आवंढा गिळत मनाला सावरले.

औरंगाबाद ‘मध्य’तून तनवाणींची माघारऔरंगाबाद मध्य मतदारसंघातून उद्धवसेनेचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. उद्धवसेनेने तडकाफडकी बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी घोषित केली. 

पत्ता कट झाल्याने आमदार वनगा ढसाढसा रडले उमेदवारीचा पत्ता कट झाल्याने पालघरचे शिंदेसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांनी माध्यमांपुढे ओक्साबोक्सी रडतच मनातील संतापाला वाट मोकळी करुन दिली. प्लॅनिंग करून माझा घात केला. यांना प्रामाणिक काम करणारा माणूस नको, तर लबाडी करणारा, हप्ते गोळा करणारा माणूस हवा होता, पण मी ते करू शकणार नसल्यानेच माझा पत्ता कट केला, असे त्यांनी रडत रडतच सांगितले.पालघर, बोईसर आणि डहाणू या तीन ठिकाणी महायुतीने उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आपला पत्ता कट झाल्याने पालघरचे आ. वनगा रविवारपासून नैराश्यामध्ये असून सारखे आत्महत्या करण्याच्या गोष्टी करत असल्याची माहिती वनगा यांच्या पत्नीने पत्रकार परिषदेत दिली.

स्वत:ची काढली अंत्ययात्रालातूर शहर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार लालासाहेब शेख यांनी अर्ज दाखल करताना सोमवारी स्वतःची अंत्ययात्रा काढून काँग्रेस आणि भाजपला विरोध दर्शविला. उमेदवार लालासाहेब शेख म्हणाले, मी जनतेसमोर समस्या मांडत आहे. माझा मोर्चा काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात आहे. आमदार अमित देशमुख आमची मते घेतात; पण आमच्यासाठी काम करत नाहीत. मुस्लिमांच्या प्रश्नांवर त्यांचे मौन आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी