शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

“चर्चा करुन काय उपयोग, त्यांचा मालकच भरकटलाय”; विखे पाटील भेटीनंतर जरांगेंची फडणवीसांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:30 IST

Manoj Jarange Patil Reaction After BJP Radhakrishna Vikhe Patil Met: सर्व समाज आपल्यासोबत आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil Reaction After BJP Radhakrishna Vikhe Patil Met: आता मैदान वेगळे आहे, ते जिंकायचे की पाडायचे ठरेल. नारायणगडाची सभा झाल्यापासून इच्छुक उमेदवार वाढल्याचे वाढत आहे. जेव्हा ठरेल जो कोणत्याही पक्षाचा असेल तो आमच्या विचाराचा असेल तर मराठे त्याच्यामागे त्याच्या मागे उभे राहणार आहेत. 'माझे ऐक नाहीतर खतम करू' अशी सूडबुद्धीची रचना सुरू आहे. त्यांचा शेवट राजकीय अंतात असेल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, इच्छुक उमेदवार यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. ज्यावेळी पाडायचे की लढायचे हे ठरेल, तेव्हा बाकीच्या बाबी ठरतील. आता फक्त चर्चा होणे आवश्यक आहे. इथे येणारे इच्छुक उद्याचे भविष्य आहेत. माझ्या समाजासाठी ही चर्चा गरजेची आहे. २० तारखेची बैठक व्यापक आणि निर्णायक आहे. आता कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

चर्चा करुन काय उपयोग, त्यांचा मालकच भरकटलाय

मध्यरात्री सुमारे २ वाजता भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटीत भेट घेतली. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मात्र गुलदस्त्यात असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या भेटीबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, आता चर्चा करून काय उपयोग, सरकार नाही येऊन तरी काय करायचे, निर्णय घेता येत नाही. ज्यावेळी करायचे होते तेव्हा केले नाही, त्यांना दोष देऊन काय उपयोग? त्यांचा मालकच (देवेंद्र फडणवीस) भरकटला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

दरम्यान, आम्हाला  शेतकरी, मुस्लीम, गोरगरिब ओबीसींचे, अलुतेदार बलुतेदार यांचे सर्वांचे काम करायचे आहे. हे राज्य कोणा एका जातीचे नाही, आपल्याला सर्वांना मिळून काम करायचे आहे. सर्व समाज आपल्यासोबत आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत लढायचे की पाडायचे, याचा अंतिम निर्णय समाजाला विचारून घेतला जाणार आहे. त्यासाठी २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान राज्यातील मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस