शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

२०-३० जागांवर उमेदवार देणार, जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीत केली घोषणा; रात्री उशिरापर्यंत यादी अंतिम करण्याचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 07:25 IST

Maharashtra Assembly Election 2024: दिवसभरात २५ विधानसभा मतदारसंघांवर चर्चा झाली असून, सोमवारी सकाळी ७ पर्यंत उमेदवार आणि मतदार संघ जाहीर करू. मराठा, मुस्लीम आणि दलित मिळून २० ते ३० जागा लढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

 वडीगोद्री (जि.जालना) : दिवसभरात २५ विधानसभा मतदारसंघांवर चर्चा झाली असून, सोमवारी सकाळी ७ पर्यंत उमेदवार आणि मतदार संघ जाहीर करू. मराठा, मुस्लीम आणि दलित मिळून २० ते ३० जागा लढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. एका जातीवर निवडणूक लढणे शक्य होणार नाही. त्यामुळे कोणीही हट्ट करून मतदारसंघ वाढवू नये. दिलेले उमेदवार विजयी करण्यासाठी काम करावे, आरक्षित जागेवर पाठिंबा द्यावा आणि इतर ठिकाणी पाडापाडी करावी, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केले. जरांगे पाटील यांनी रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली. दिवसभरात २५ मतदारसंघांवर चर्चा झाली. 

या जागांवर चर्चा सुरू- पाथर्डी व शेवगाव, करमाळा, वसमत, हिंगोली, कन्नड, पाथरी, गंगाखेड, लोहा, कंधार, तुळजापूर, भूम-परंडा, कोपरगाव, नेवासा, पाचोरा, माढा, धुळे, निफाड आणि नांदगाव या विधानसभा मतदारसंघांबाबत रात्री उशिरापर्यंत जरांगे यांची चर्चा सुरू होती.सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा अंतिम दिवस आहे. सकाळी ७ वाजेपर्यंत उमेदवार अंतिम केले जातील. २० ते ३० जागा लढविल्या जाणार असून, त्यात वाढ होईल किंवा कमीही होतील, असेही जरांगे म्हणाले. 

अन् मनाेज जरांगे यांना झाले अश्रू अनावर... मराठा समाजावर सरकारने खूप अन्याय केला आहे. हातातोंडाशी आलेला आरक्षणाचा घास हिरावून घेतला आहे. आम्हाला राजकारणाची हौस नाही. परंतु, त्यांनी आम्हाला तिथे ओढलं आहे. आम्ही आमच्या समाजावर झालेल्या अन्यायाचा बदला घेणार असून, समाजाचे बळ वाढावे म्हणून कुटुंबाला दूर ठेवून आपण लढा देत आहोत, असे सांगताना जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले होते.

मराठा-मुस्लीम-दलित  ‘एमएमडी’ समीकरण- जरांगे पाटील यांनी मराठा, मुस्लीम आणि दलित समाज असे समीकरण तयार करत उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली आहे. - दोन दिवसांपूर्वी आंतरवाली सराटी येथे मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांच्याशी मनोज जरांगे यांनी बंदद्वार प्रदीर्घ चर्चा केली होती. - त्यानंतर या तिघांनीही पत्रपरिषदेत ‘एमएमडी’ समीकरणाची मोट बांधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

मराठा समाज, मुस्लीम समाज आणि दलित समाजाची ताकद जिथे आहे, तेथे उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा, मुस्लीम, दलित, गरजू ओबींसींसह १८ पगड जातींचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मोजक्याच जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. ते उमेदवार जिंकून आणायचे आणि इतर ठिकाणी पाडापाडी करायची, असे जरांगे म्हणाले.  

 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण