शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 15:23 IST

Maharashtra assembly Election 2024: माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देणार तसेच येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे आपली उमेदवारी मागे घेणार, अशी चर्चा रंगली आहे. मात्र शिंदे गटाचे उमेदवार असलेले सदा सरवणकर यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याच ठामपणे सांगितलं आहे.

मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने महेश सावंत तर शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिल्याने येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणून महायुती माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देणार तसेच येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे आपली उमेदवारी मागे घेणार, अशी चर्चा रंगली आहे. मात्र शिंदे गटाचे उमेदवार असलेले सदा सरवणकर यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याच ठामपणे सांगितलं आहे. मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विधानसभा निवडणुकीत विजयी होणार, असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला. 

माहिममधील विद्यमान आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर हे निवडणुकीतून माघार घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाशी बोलताना सदा सरवणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, माहिममधील लढतीबाबत शिवसेनेमध्ये चर्चा नाही, तर विरोधी मंडळींमध्ये चर्चा सुरू आहे. मी उद्या १० वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. तसेच शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाणं, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दादर माहिममधील जनतेला, मतदारांना न्याय देणं ही आजची काळाची गरज आहे. ३६५ दिवस आम्ही या मतदारसंघामध्ये काम करतो. सर्वसामान्यांमधील उमेदवार म्हणूल लोक माझ्याकडे बघतात. त्यामुळे इतर कुठल्याही चर्चेकडे दुर्लक्ष करा. मी उद्या सकाळी उमेदवारी अर्ज भरणार आहे. 

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीबाबत सदा सरवणकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला वेळ देण्याचं काही कारणच नाही आहे. त्यांनी आशीर्वाद दिले. एबी फॉर्म दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून दिवसातून एकदा वर्षावर जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे सरवणकर यांनी सांगितले. दरम्यान, अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत दीपक केसरकर आणि आशिष शेलार यांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. आतापर्यंत तसा कुठलाही प्रस्ताव ठेवण्यात आलेला नाही. निदान माझ्यापर्यंत तरी आलेला नाही,  असेही सदा सरवणकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mahim-acमाहीमsada sarvankarसदा सरवणकरAmit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना