शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:51 IST

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीतील छोट्या घटक पक्षांपैकी प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने ५ जागा द्या अन्यथा आम्ही २५ जागांवर निवडणूक लढवणार असा थेट इशाराच दिला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ येत चालली तरी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा धोळ अद्यापही सुटलेला नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांना आपापल्या पहिल्या यादीमधून काही जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र बहुतांश जागांवरील तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच महाविकास आघाडीकडून मित्रपक्षांना किती जागा मिळणार हेही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांच्या मनामध्ये चलबिचल निर्माण झालेली आहे. तसेच महाविकास आघाडीतील छोट्या घटक पक्षांपैकी प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने ५ जागा द्या अन्यथा आम्ही २५ जागांवर निवडणूक लढवणार असा थेट इशाराच दिला आहे.

समाजवादी पक्षाला विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपामधून किमान ५ जागा मिळाव्यात अन्यथा आम्ही २५ जागांवर लढण्याची तयारी केली आहे, असं सूचक विधान समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अबू आझमी यांनी केलं आहे. उद्यापर्यंत महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालं नाही तर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर  दिला आहे.

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले की, शरद पवार यंच्यापेक्षा मोठा नेता महाविकास आघाडीमध्ये आहे, असं मला वाटत नाही. शरद पवारच आहेत ज्यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते. मी केवळ त्यांच्याकडे एवढंच सांगण्यासाठी आलो होतो की, मी पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तुम्ही उत्तर देत असाल तर ठीक आहे नाहीतर माझ्याकडे २५ उमेदवार तयार आहे. त्यांना मी उमेदवारी देईन. कारण याआधी माझी दोनवेळा काँग्रेसकडून फसवणूक झालेली आहे. कारण हे लोक शेवटच्या एक दोन दिवसांपर्यंत वाट पाहा, वाटा पाहा असं सांगतात आणि शेवटच्या क्षणी फसवणूक करतात, असा आरोप अबू आझमी यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी मला एक दिवस थांबण्यास सांगितलं आहे. जर यांनी तोपर्यंत आम्हाला ५ जागा देण्याची घोषणा केली तर मी महाविकास आघाडीमध्ये राहीन. नाहीतर मी आमचे २५-३० उमेदवार मैदानात उतरवेन. मग त्यांच काय व्हायचं ते होऊ दे, असा इशाराच अबू आझमी यांनी दिला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAbu Azmiअबू आझमीSharad Pawarशरद पवार