शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 10:38 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या भाजपमधील ४० जणांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसा आदेश काढला आहे. 

 मुंबई - विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या भाजपमधील ४० जणांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसा आदेश काढला आहे. 

असे असले, तरी अजूनही काही बंडखोर उमेदवारांवर प्रदेश भाजपने कारवाई केलेली नाही. अहमदनगरच्या अकोले मतदारसंघात माजी आमदार वैभव पिचड बंडखोरी करून अपक्ष लढत आहेत. शिर्डीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरुद्ध बंडखोर राजेंद्र पिपाडा अपक्ष लढत आहेत. अहमदपूरमध्ये माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी माघार तर घेतली, पण दुसरे भाजप बंडखोर गणेश हाके यांना पाठिंबा दिला. हाके यांच्यावरही कारवाई केलेली नाही.  अकोला पश्चिममधील भाजप बंडखोर हरिश आलिमचंदानी, डॉ.अशोक ओळंबे यांनी बंडखोरी केली. रिसोडमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख हेही बंडखोर आहेत, पण अजून त्यांच्यावर कारवाई केलेली नाही.  

जे पदाधिकारी पक्षविरोधी कारवाया करतील, मित्रपक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत किंवा मित्रपक्ष सोडून दुसऱ्यांचा प्रचार करतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. आईसमान असलेल्या पक्षात राहण्याचा पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना अधिकार नाही. - चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष 

यांची केली भाजपमधून हकालपट्टीधुळे ग्रामीण - श्रीकांत करर्ले, सोपान पाटील, जळगाव शहर - मयूर कापसे, अश्विन सोनवणे, अकोट - गजानन महाले, वाशिम - नागेश घोपे, बडनेरा - तुषार भारतीय, अमरावती - जगदीश गुप्ता, अचलपूर - प्रमोद गड्रेल, साकोली - सोमदत्त करंजेकर, आमगाव - शंकर मडावी, चंद्रपूर - ब्रिजभूषण पाझारे, ब्रह्मपुरी - वसंत वरजूरकर, वरोरा - राजू गायकवाड, अतेशाम अली, उमरखेड - भाविक भगत, नटवरलाल उंटवल, नांदेड उत्तर - वैशाली देशमुख, मिलिंद देशमुख, नांदेड दक्षिण - दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे, घनसावंगी - सतीश घाटगे, जालना - अशोक पांगारकर, गंगापूर - सुरेश सोनावणे, वैजापूर - एकनाथ जाधव, मालेगाव बाह्य - कुणाल सूर्यवंशी, बागलाण - आकाश साळुंखे, जयश्री गरुड, नालासोपारा - हरीश भगत, भिवंडी ग्रामीण - स्नेहा पाटील, कल्याण पश्चिम - वरुण पाटील, मागाठणे - गोपाळ जव्हेरी, जोगेश्वरी पूर्व - धर्मेंद्र ठाकूर, अलिबाग - दिलीप भोईर, नेवासा - बाळासाहेब मुरकुटे, सोलापूर शहर उत्तर - शोभा बनशेट्टी, अक्कलकोट - सुनील बंडगर, श्रीगोंदा - सुवर्णा पाचपुते, सावंतवाडी - विशाल परब.

 

 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMahayutiमहायुती