शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

आजवर २५ हजार विधानसभा उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त

By यदू जोशी | Updated: October 30, 2024 09:03 IST

Maharashtra Assembly Election 2024 :आतापर्यंत ३३,५६४ जणांनी निवडणुकीत अजमावले भाग्य, पण आमदार झाले ३,६८४

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : राज्यात १९६२ पासूनच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २५,२०९ उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली. आतापर्यंत एकूण ३३,५६४ उमेदवारांनी १३ विधानसभा निवडणुकांद्वारे विधानसभेत जाण्याचा प्रयत्न केला, पण यश आले ते केवळ ३,६८४ उमेदवारांनाच. 

गेल्या १३ विधानसभा निवडणुकांमध्ये लढलेल्या एकूण उमेदवारांपैकी ७५ टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.   १४ टक्के उमेदवार असे होते की, जे निवडून गेले नाहीत, पण अनामत रक्कम वाचविण्यात यशस्वी झाले. ११ टक्के उमेदवार निवडून गेले; त्यांनाही अर्थातच अनामत रक्कम परत मिळाली.

राज्यात सर्वाधिक उमेदवार संख्या १९९५ मध्ये होती, त्यावेळी ४,७२७ उमेदवार रिंगणात होते, त्यातील ४,०५९ जणांची अनामत रक्कम जप्त झाली. अनामत जप्त होणाऱ्या उमेदवारांचा हा आजवरचा सर्वाधिक मोठा आकडा आहे. अनामत रक्कम वाचली, अशा उमेदवारांची सर्वाधिक संख्या १९९९ च्या निवडणुकीत होती. त्यावेळी ४३६ उमेदवार अनामत वाचवू शकले. 

लढले किती, जिंकले किती, कितींचे गेले डिपॉझिटवर्ष    उमेदवारांची     जिंकलेल्या     जिंकण्याची     डिपॉझिट    डिपॉझिट गेलेल्या    जिंकले नाहीत पण     डिपॉझिट वाचले     एकूण                                                                                                                                    संख्या    जागा    टक्केवारी     गेले    उमेदवारांची टक्केवारी    डिपॉझिट वाचले    त्यांची टक्केवारी    मते १९६२    ११६१    २६४    २२.७    ५९०    ५१    ३०७    २६    १०९६६२७९ १९६७    १२४२    २७०    २१.७    ६४७    ५२    ३२५    २६    १३३७१७३५ १९७२    ११९६    २७०    २२.६    ६७०    ५६    २५६    २१    १५१४६१७१ १९७८    १८१९    २८८    १५.८    ११५९    ६४    ३७२    २०    २०३६७२२१ १९८०    १५३७    २८८    १८.७    ८८६    ५८    ३६३    २४    १७५४८६५५ १९८५    २२३०    २८८    १२.९    १६००    ७२    ३४२    १५    २१९३४७४२ १९९०    ३७६४    २८८    ७.७    ३०८९    ८२    ३८७    १०    २९६९३८३८ १९९५    ४७२७    २८८    ६.१    ४०५९    ८६    ३८०    ८    ३८५२६२०६ १९९९    २००६    २८८    १४.४    १२८२    ६४    ४३६    २२    ३२८५६६९३ २००४    २६७८    २८८    १०.८    २०२१    ७५    ३६९    १४    ४१८२९९४२ २००९    ३५५९    २८८    ८.१    २८८६    ८१    ३८५    ११    ४५३१४८५५ २०१४    ४४०७    २८८    ६.५    ३७१३    ८४    ४०६    ९    ५२९०१३२६ २०१९    ३२३८    २८८    ८.९    २६०७    ८१    ३४३    ११    ५५१५०४७० एकूण    ३३५६४    ३६८४    ११    २५२०९    ७५    ४६७१    १४    ३९५६०८१३३

डिपॉझिट जप्त होते, म्हणजे नक्की काय होते?उमेदवाराला अर्जासोबत अनामत रक्कम (डिपॉझिट) भरावी लागते. एकूण वैध मतदानाच्या एक षष्ठांशापेक्षा कमी मते ज्या उमेदवाराला मिळतात, त्याची अनामत रक्कम जप्त होते. त्यापेक्षा जास्त मते घेतलेल्यांची अनामत रक्कम वाचते व ती त्यांना परत केली जाते. उदाहरणार्थ, एकूण वैध मते २ लाख असतील, तर अनामत रक्कम वाचण्यासाठी किमान ३३,३३२ मते मिळालेली असावीत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी प्रत्येकी १२,५०० रुपये तर इतरांसाठी २५ हजार रुपये अनामत रक्कम असते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidhan sabhaविधानसभा