शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
4
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
5
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
6
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
7
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
8
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
9
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
10
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
11
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
12
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
13
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
14
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
15
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
16
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
17
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
18
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
19
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
20
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 07:08 IST

Maharashtra Assembly Election 2024: एससी, एसटी आणि ओबीसी या जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस देशात आणि राज्यात खेळत आहे. हा समाज एकत्र आला तर आपले राजकीय दुकान बंद होईल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

धुळे/नाशिक - एससी, एसटी आणि ओबीसी या जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस देशात आणि राज्यात खेळत आहे. हा समाज एकत्र आला तर आपले राजकीय दुकान बंद होईल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे, असा घणाघाती आरोप करीत 'एक है तो सेफ है', असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचार शुभारंभप्रसंगी दिला. महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाके आहेत, ना ब्रेक आणि गाडीचा ड्रायव्हर बनण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. 

महायुतीच्या धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी दोन सभा घेतल्या. धुळ्याच्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल आदींसह उमेदवार उपस्थित होते. काँग्रेसने नेहमी दहशतवादाला संरक्षण दिल्याची टीका मोदींनी यावेळी केली.

सावरकर, बाळासाहेबांच्या प्रशंसेचे आव्हान: स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोठे असतानाही काँग्रेस त्यांची कधीच प्रशंसा करत नाही. त्यामुळे उद्धवसेनेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सार्वजनिक सभेत या दोघांची प्रशंसा करून दाखवावी, असे आव्हान मोदी यांनी दिले. 

पोलिस दलात २५ हजार युवतींची भरती, मुंबईत नवे मोठे विमानतळ: मुंबईत वाढवण बंदरासोबतच एक नवे मोठे विमानतळ बांधणार तसेच १५ नोव्हेंबरपासून वर्षभर बिरसा मुंडा यांची १५०वी जयंती देशात उत्साहात साजरी करण्यासोबतच राज्य पोलिस दलात २५ हजार युवतींची भरती करण्याच्या घोषणाही मोदी यांनी केल्या.  

हिमाचल, कर्नाटक, तेलंगणात सर्व आश्वासने फिरविलीमहाराष्ट्रात दुसऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीत   महायुती सरकारने अनेक विकास योजना राबविल्या. लाडकी बहीण योजनेची तर देशभरात चर्चा आहे. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राची प्रगती सहन होत नसल्याने आघाडी समवेत ते सत्तेवर आल्यास या चांगल्या कल्याणकारी योजना बंद करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.राज्यात महायुती असेल तरच प्रगती होईल असे मोदी यांनी, राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास चांगल्या योजनांना खीळ बसेल. यापूर्वीही समृद्धी महामार्गासह अनेक योजनांना काँग्रेस आघाडी सरकारने खीळ घातली होती. सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथे सर्व आश्वासने फिरविली. महाराष्ट्रात असेच करणार, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना वीज बिल मुक्ती दिली : फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात ८ हजार कोटींचा विमा दिला आहे, तसेच शेतकऱ्यांचे १०० टक्के वीज बिल माफ केले आहे. तसेच, पुढील पाच वर्षांसाठी शेतकऱ्यांना वीज बिल मुक्ती दिली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन: देशात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत महाराष्ट्र गेल्या दोन वर्षांपासून नंबर वनवर आहे. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करण्यात आली आहे, यातून महाराष्ट्राच्या प्रगतीला गती मिळत असल्याचे मोदी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा