शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:43 IST

अमरावती येथे राज ठाकरेंनी सभा घेत मशि‍दीवरील भोंग्यासह हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून जनतेला साद घातली. त्यावरून स्थानिक काँग्रेस खासदार वानखेडेंनी पलटवार केला आहे. 

दर्यापूर - अमरावती येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशि‍दीवरील भोंगे काढण्यावरून विधान केले. या विधानावर काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरे यांचे हे वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना काळिमा फासणारे आहे असं खासदारांनी म्हटलं. दर्यापूर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती. या सभेत बळवंत वानखेडे यांनी राज यांच्या विधानावर भाष्य केले. 

खासदार बळवंत वानखेडे म्हणाले की, काल राज ठाकरे आले होते, त्यांनी मशि‍दीवरील भोंगे काढण्याचं विधान केले. त्यांची ही घोषणा जुनीच आहे. परंतु वाईट या गोष्टीचे वाटते. त्यांच्या झेंड्यावर छत्रपती शिवरायांची मुद्रा आहे. छत्रपती शिवरायांना अपेक्षित होते, मंदिर असेल त्याच्या बाजूला मशीद असली पाहिजे. आपले जे गडकिल्ले आहेत तिथे मशीद असली पाहिजे हे धोरण छत्रपती शिवरायांचं होते. त्या शिवरायांच्या विचारांना काळिमा फासणारं विधान होते अशी टीका त्यांनी केली. 

त्याशिवाय बडनेरा मतदारसंघात मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर पाहिले, त्याबाजूला जिल्ह्यातील भाभीचे फोटो होते. बाळासाहेब ठाकरेंसोबत फोटो लावण्याची या लोकांना लाज कशी वाटत नाही. ज्यांनी मातोश्री बनवली. त्या मातोश्रीला त्रास देणे, उद्धव ठाकरेंना त्रास देणे हे काम त्यांनी केले. आजपर्यंतच्या उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांपैकी उद्धव ठाकरे आदर्श मुख्यमंत्री होते. त्यांनी कोरोना काळात सर्वांना सोबत घेऊन केलेले काम, ही किमया त्यांच्यात होती. योगायोगाने काय झाले सगळ्यांना माहिती आहे. ५० खोके हे सगळ्यांना माहिती आहे असं सांगत खासदार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणांसह एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांवर निशाणा साधला.

दरम्यान, उद्धव ठाकरेंचे मी आभार मानतो, त्यांच्या आशीर्वादाने मी आज लोकसभेत पोहचलो. खऱ्या अर्थाने त्यांचा आशीर्वाद मला लाभला. अमरावती जिल्ह्याची खासदारकी त्यांच्या वाट्याला होती. मात्र त्यांनी मला इथं उमेदवार केले त्यामुळे त्यांचे आभार मानतो. ही लढाई उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी आहे. राज्य वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी तसेच संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे. आपल्याला महाविकास आघाडी सरकार आणणं गरजेचे आहे. जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट राबवण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे असा विश्वास खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केला.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४amravati-acअमरावतीMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज