शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

चंद्रशेखर बावनकुळेंनी दंड थोपटले, काँग्रेसला चमत्काराची आस

By योगेश पांडे | Updated: November 7, 2024 06:35 IST

Maharashtra Assembly Election 2024: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवडणूक रिंगणातील घरवापसीमुळे कामठी मतदारसंघाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाच्या नजरा आहेत. २००४ पासून ही जागा भाजपकडेच असली तरी लोकसभेतील निराशाजनक कामगिरीमुळे भाजपसमोर आव्हान आहे.

- योगेश पांडेनागपूर -  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवडणूक रिंगणातील घरवापसीमुळे कामठी मतदारसंघाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाच्या नजरा आहेत. २००४ पासून ही जागा भाजपकडेच असली तरी लोकसभेतील निराशाजनक कामगिरीमुळे भाजपसमोर आव्हान आहे. तर लोकसभेसारखेच मताधिक्य मिळविण्यासाठी काँग्रेसकडून पूर्ण दम लावण्यात येत आहे.

या मतदारसंघात एकूण १९ उमेदवार उभे आहेत. बावनकुळेंनी २००४, २००९ व २०१४ च्या निवडणुकीत येथून विजयाची हॅटट्रिक लगावली होती व याच्याच भरवशावर त्यांना राज्याचे ऊर्जामंत्रिपद मिळाले होते. मात्र २०१९ मध्ये अनपेक्षितपणे त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली. सावरकर यांना ११ हजार १३६ मतांनीच विजय मिळवता आला होता. २०१४ च्या मताधिक्य तुलनेत ७० टक्क्यांहून अधिक घटले होते. यावेळी सर्वेक्षणाच्या आधारे कामठीच्या विधानसभेत पक्षाने परत बावनकुळे यांच्यावरच विश्वास टाकला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून परत सुरेश भोयर यांनाच उमेदवारी मिळाली. 

मतदारसंघातील कळीचे मुद्दे- अनुसूचित जाती, मुस्लीम आणि बहुजन मतदारांची ताकद ज्यांच्यासोबतअसेल तोच यावेळी कामठीत मैदान मारेल हे निश्चित आहे.- मतदारसंघात मुस्लीम मतदारांची लक्षणीय संख्या असून १९ पैकी सहा उमेदवार या समाजाचे आहेत. त्यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता आहे.-कामठी मतदारसंघात बेसा, हुडकेश्वर, पिपळा, नरसाळा, बहादुरा हा शहराच्या सीमेवरील भागदेखील येतो व येथील सव्वा लाखावर मतदार आहेत. शहरी भागाशी कनेक्ट करण्याचे नेते-पदाधिकाऱ्यांसमोर आव्हान.-राज्य व केंद्र शासनाच्या योजनांच्या भरवशावर प्रत्येक गावात भाजपकडून गृहसंपर्कावर भर, तर बेरोजगारी, उद्योगांचा अभाव हे महाविकास आघाडीचे प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे आहेत.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kamthi-acकामठीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाcongressकाँग्रेस