शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-काँग्रेस तब्बल ७४ जागांवर आमने-सामने, विधानसभेच्या २५% मतदारसंघांत दोन राष्ट्रीय पक्षांत होणार झुंज

By यदू जोशी | Updated: November 4, 2024 11:40 IST

Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पक्ष व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष विधानसभा निवडणुकीत तब्बल ७४ मतदारसंघांमध्ये आमने-सामने लढत आहेत. याचा अर्थ राज्यातील एकूण लढतींपैकी २५ टक्के लढती या दोन परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये होतील.

- यदु जोशी  मुंबई -  भारतीय जनता पक्ष व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष विधानसभा निवडणुकीत तब्बल ७४ मतदारसंघांमध्ये आमने-सामने लढत आहेत. याचा अर्थ राज्यातील एकूण लढतींपैकी २५ टक्के लढती या दोन परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये होतील.

भाजपचे अनेक दिग्गज नेते काँग्रेस विरोधात लढत आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, डॉ. विजयकुमार गावित, संभाजी पाटील निलंगेकर, डॉ. संजय कुटे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी मंत्री मदन येरावार, अशोक उईके यांचा समावेश आहे.

भाजपविरोधात लढत असलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अस्लम शेख, वसंत पुरके, अमित देशमुख, त्यांचे बंधू धीरज देशमुख, विश्वजीत कदम, आदींचा समावेश आहे.

गेल्या वेळी होते अपक्ष, आता भाजपचे उमेदवार चंद्रपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आणि अपक्ष, असा सामना २०१९ मध्ये झाला होता आणि अपक्ष किशोर जोरगेवार ७२ हजारावर मतांनी जिंकले होते, ते यावेळी भाजपचे उमेदवार आहेत. गेल्यावेळी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होती. गोंदियामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला होता, अपक्ष विनोद अग्रवाल विजयी झाले होते, तेच यावेळी भाजपचे उमेदवार आहेत. गेल्यावेळी भाजपचे उमेदवार असलेले गोपालदास अग्रवाल हे यावेळी काँग्रेसचे उमेदवार आहेत.

विदर्भात कुणाची सरशी? - विदर्भ हा एकेकाळचा काँग्रेसचा गड, पण गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने तो हिसकावून घेतला. मात्र, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्राबल्य राहिले.- हा निकाल टिकविण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. तर, तो एक अपवाद होता, विदर्भावर वर्चस्व भाजपचेच हे सिद्ध करण्याचे आव्हान भाजपसमोर असेल.  

२०१९ मध्ये या ७४ जागांवर काय स्थिती? - या ७४ पैकी ४२ जागा २०१९ च्या निवडणुकीत भाजपने, तर काँग्रेसने २४ जागा जिंकल्या होत्या. बहुजन विकास आघाडी दोन, प्रहार जनशक्ती पक्ष दोन, राष्ट्रवादी एक, तर तीन अपक्षांनी जिंकल्या होत्या.- तीन अपक्षांपैकी मीरा-भाईंदरची जागा गेल्यावेळी भाजपच्या बंडखोर गीता जैन यांनी जिंकली होती. त्यांनी भाजपचे नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. तेच मेहता यावेळीही भाजपचे उमेदवार आहेत. गेल्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले मुजफ्फर हुसेन हेच याहीवेळी काँग्रेसकडून लढत आहेत.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस