शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

Chitra Wagh : "उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत"; चित्रा वाघ यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 15:22 IST

Maharashtra Assembly Election 2024 BJP Chitra Wagh : भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सलग दोन दिवस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचा मुद्दा गाजत आहे. बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरे हे आयोगाच्या अधिकाऱ्यांवर संतापले होते. फक्त विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जात आहेत का? असा सवालही केला होता. याच दरम्यान भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. 

"उद्धवजी... बॅगा फक्त तुमच्या तपासल्या जात नाही तर प्रत्येकाच्या बॅगा तपासल्या जातात. मात्र प्रत्येकजण तुमच्यासारखा कांगावा करत नाही. आम्हाला तेवढा वेळ सुद्धा नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग चेक करतानाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

"उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत... लहान सहान गोष्टींवर कांगावा करताना ते दिसताहेत... सध्या उबाठांचा निवडणूक आयोगाकडून तपासण्यात येणाऱ्या बॅग्सचा व्हिडीओ फिरतोय... अहो उद्धवजी... बॅगा फक्त तुमच्या तपासल्या जात नाहीत तर प्रत्येकाच्या बॅगा तपासल्या जातात. मात्र प्रत्येकजण तुमच्यासारखा कांगावा करत नाही. आम्हाला तेवढा वेळ सुद्धा नाही."

"चला तुम्हाला देवेंद्रजींचा व्हिडीओ पाहायचा होता ना? हा घ्या व्हिडीओ... ७ नोव्हेंबरचा व्हिडीओ आहे बरं नाहीतर परत कांगावा कराल. हा कांगावा करत असताना उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा पाहायला मिळतो. उद्धवजी तुम्ही विसरलात की ही लोकशाही आहे... इथे गुंडशाहीला थारा नाही. जातीयवादाला जागाच नाही."

"तुमचे पाणचट जातीयवादी टोमणे एका गरिब माणसाच्या जिव्हारी लागू शकतात. निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाची तपासणी होत असते मग ते विरोधक असो किंवा सत्ताधारी. तुमच्यासारखा पाणचटपणा करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. आमचा वेळ हा जनतेचा आहे. तुमचा कांगावा हा फेक नरेटिव्हचा भाग आहे. याला जनता भूलणार नाही" असं म्हणत चित्रा वाघ यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

"विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय"

राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला आहे. "सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याच बॅगा कशा चेक होतात. उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जातंय. रोज उद्धवजींची मग अमोल कोल्हे यांची... असं कसं होऊ शकतं? आज कशी बॅगची तपासणी झाली... कारण टीव्हीवर दोन दिवस उद्धवजी यांची तपासणी केल्याचं दाखवलं. इतके दिवस का नाही झाली? उद्धव ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही? आणि जर आधी झाली असेल तर आधी का सांगितलं नाही?" असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस