शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला विखेंच्या सभांमुळे चर्चेत

By शेखर पानसरे | Updated: November 8, 2024 08:53 IST

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेला संगमनेर मतदारसंघ यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या सभांनी चर्चेत आला. पण, ऐनवेळी विखे यांनी स्वत: उमेदवारी न करता अमोल खताळ यांना शिंदे गटाकडून रिंगणात उतरवले आहे.

- शेखर पानसरेसंगमनेर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेला संगमनेर मतदारसंघ यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या सभांनी चर्चेत आला. पण, ऐनवेळी विखे यांनी स्वत: उमेदवारी न करता अमोल खताळ यांना शिंदे गटाकडून रिंगणात उतरवले आहे. 

या मतदारसंघात थोरात हे १९८५ साली सर्वप्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर सलगपणे त्यांनी काँग्रेसकडून विजय मिळविला. सहकारी साखर कारखाना, सहकारी दूध संघ, शैक्षणिक संस्था यांचे भक्कम जाळे असल्याने त्यांचे तालुक्यावर वर्चस्व आहे. थोरात विरोधकांना संस्थात्मक तसेच संघटनात्मक जाळे निर्माण करता आले नाही. हा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात आहे. मात्र, सेनेचे संघटन नाही. केवळ निवडणुकीत संघटनेची चर्चा होते. यावेळी सेनेपेक्षाही भाजपचे विखे येथे आक्रमक झाले आहेत. मात्र, मतदारसंघ भाजपने न घेता तो शिंदेसेनेकडे गेला. भाजपचे अमोल खताळ हे येथे शिंदेसेनेकडून उमेदवारी करत आहेत. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे    महाविकास आघाडीची सत्ता आल्यास थोरात हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहू शकतात. त्यामुळे तो मुद्दा चर्चेत आहे. सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी थोरातांच्या कन्या जयश्री देशमुख यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. महिलांच्या अवमानाचा हा मुद्दा कॉंग्रेस प्रत्येक सभेत मांडत आहे. महायुतीकडून विखे प्रचारात सक्रिय झाले. त्यामुळे या निवडणुकीला थोरात विरुद्ध विखे या वादाची झालर आली आहे. निळवंडे धरणाचे पाणी संगमनेर, राहाता तालुक्याला आपण मिळवून दिले हा थोरातांचा प्रचाराचा मुद्दा आहे. दुसरीकडे विखे पाटील देखील या बाबीचे श्रेय घेत आहेत.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangamner-acसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसSujay Vikheसुजय विखे