शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
4
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
5
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
6
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
7
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
9
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
10
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
11
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
12
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
13
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
14
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
15
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
16
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
17
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
18
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
19
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
20
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

महायुतीला आणखी एक धक्का? हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार? भाजपाला धडा शिकवायचा निर्धार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:37 IST

Maharashtra Assembly Election 2024: गेल्या १० वर्षांत अनेकदा अडचणीच्या काळात महायुतीला मदत करणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाला धडा शिकवायचा निर्धार करण्यामागचे कारण काय?

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. यातच आता अडचणीच्या काळात अनेकदा मदत करणारे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूरमहायुतीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीला साथ देण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, मविआची साथ बविआला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

गेल्या २५ वर्षांपासून वसई विरारच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या १० वर्षांत हितेंद्र ठाकूर यांनी वेळोवेळी महायुतीला साथ दिली. मात्र, आता हितेंद्र ठाकूर हे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

१० वर्षांची साथ मग आताच का भाजपाला धडा शिकवायचा निर्धार?

गेल्या काही दिवसांपासून हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊ आणि बविआचे कार्याध्यक्ष राजीव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. राजीव पाटील यांचा भाजपा प्रवेश जवळपास निश्चित असून ते नालासोपाऱ्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा असले तरी राजीव पाटील हे पक्षात दोन नंबरचे नेते म्हणून ओळखले जातात. राजीव पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून नवरात्रोत्सवात भाजप कार्यकर्त्यांच्या मंडळांना भेटी दिल्या होत्या. राजीव पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. याच कारणावरून भाजपा आणि पर्यायाने महायुतीला शह देण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी नवी खेळी केली आहे. बविआला पाठिंबा दिल्यास हितेंद्र ठाकूर मविआचे तीन उमदेवार निवडून आणू शकतात, अशी चर्चाही सुरू आहे. 

नालासोपाऱ्यात रंगणार काका-पुतण्यांची लढत?

हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर तीनवेळा नालासोपाऱ्यातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. राजीव पाटील यांना नालासोपाऱ्यातून लढण्याची इच्छा होती. परंतु, हितेंद्र ठाकूर यांनी मुलाला झुकते माप दिले. आता राजीव पाटील भाजपामध्ये  गेल्यास नालासोपाऱ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात. त्यामुळे क्षितिज ठाकूर यांच्यासमोर आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे. राजीव पाटील यांचा स्वत:चा कार्यकर्ता वर्ग आणि समांतर यंत्रणा वसई शहरात कार्यरत आहे. राजीव पाटील यांना महाशक्तीची साथ मिळाल्यास हितेंद्र ठाकूर यांना शह देऊ शकतात, असा दावा केला जात आहे.

दरम्यान, राजीव पाटील यांचे मन वळवण्याचे प्रयत्न बहुजन विकास आघाडीने सोडून दिले आहेत. बहुजन विकास आघाडीच्या कार्यक्रमाच्या फलकांवरून राजीव पाटील यांचे नाव आणि छायाचित्रे वगळण्यात आले आहे. राजीव पाटील यांचा भाजपा प्रवेश आणि महाविकास आघाडीने बविआला पाठिंबा देण्याचा निर्णय केल्यास वसई विरारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nalasopara-acनालासोपाराHitendra Thakurहितेंद्र ठाकूरMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी