शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 17:58 IST

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्याच्या टायमिंगवर ठाकरे गटानं शंका व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुका जाहीर झाल्या, त्यामागे षडयंत्र तर नाही ना? अशी शंका ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला होता. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्याच्या टायमिंगवर ठाकरे गटानं शंका व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुका जाहीर झाल्या, त्यामागे षडयंत्र तर नाही ना? अशी शंका ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, ऐन निवडणुकीला तोंड फुटण्यापूर्वीच उद्धव ठाकरे आजारी पडणं हे आमच्या दृष्टीने दु:खदायक आहे. उद्धव ठाकरे आजारी पडल्याबरोब्बर महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंहिता लागते, ही बाब आश्चर्यकारक आहे. उद्धव ठाकरे हे आजारी असताना निवडणूक लागावी, एका टप्प्यात निवडणूक ठरवावी, आचारसंहितेसाठी ४५ दिवससुद्धा दिले न जावेत, याच्यापाठीमागे षडयंत्र तर नाही ना? याबाबत महाराष्ट्रातील जनतेला शंका आलेली आहे, असं विधान भास्कर जाधव यांनी केलं आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना नियमित तपासणीसाठी नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजिऑप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र  आदित्य ठाकरे यांनी या वृत्तात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांना पूर्व नियोजित आणि नियमित तपासण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली होती.    

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBhaskar Jadhavभास्कर जाधव