शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

उलेमा बोर्डाचं मविआ नेत्यांना पत्र; मुस्लीम आरक्षण, पोलीस भरतीत प्राधान्य अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:57 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम संघटनांनी महाविकास आघाडीकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत. जर मविआ सरकार आलं तर त्या पूर्ण कराव्यात असं ऑल इंडिया उलेमा बोर्डाने म्हटलं आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला पत्र लिहून १७ अटी ठेवल्या आहेत. त्या अटींची पूर्तता करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर उलेमा बोर्ड मविआला निवडणुकीत पाठिंबा देणार आहे. बोर्डाने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना पत्र लिहून त्यांच्या मागण्या ठेवल्या आहेत. त्यात जर महाविकास आघाडीचं राज्यात सरकार आलं तर त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध करावा, त्याशिवाय आरएसएसवर बंदी आणावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. 

उलेमा बोर्डाने महाराष्ट्रात मुस्लिमांना १० टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. नितीश राणे यांच्यावर कारवाई करावी असंही पत्रात म्हटलं आहे. महाराष्ट्रात २८८ जागांवर येत्या २० नोव्हेंबरला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. त्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. या निवडणुकीच्या काळात भाजपाकडून सातत्याने महाविकास आघाडीवर व्होट जिहादचा आरोप लावण्यात येत आहे. त्यात ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या मागण्यांमुळे मविआवर टीका करण्याची महायुतीला संधी मिळणार आहे.

काय आहेत १७ मागण्या?

  • वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध
  • महाराष्ट्रात नोकरी आणि शिक्षणात मुस्लिमांना १० टक्के आरक्षण
  • महाराष्ट्रातील ४८ जिल्ह्यात मशीद, कब्रस्तान, दर्गा यांच्या जप्त जमिनीवर आयुक्तांकडून सर्व्हे करण्याचे आदेश द्यावेत
  • महाराष्ट्र वक्फ बोर्डाला १००० कोटींचा निधी
  • २०१२ ते २०२४ या काळात दंगलीचा आरोप झालेल्या निर्दोष मुस्लिमांना जेलबाहेर काढावे
  • मौलाना सलमान अजहरी यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या ३० खासदारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहावे
  • महाराष्ट्रातील मशिदीत इमाम आणि मौलाना यांना सरकारकडून दरमहिना १५ हजार रुपये मिळावेत
  • पोलीस भरतीत मुस्लीम युवकांना प्राधान्य द्यावे
  • इंडिया आघाडीकडून रामगिरी महाराज, नितेश राणे यांना जेलमध्ये टाकावे
  • महाराष्ट्रात मविआ सरकार येण्यासाठी ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे मुफ्ती मौलाना, अलीम हाफिज मशि‍दीच्या इमामाला सरकारी समितीत घ्यावे
  • राज्यातील वक्फ बोर्डात ५०० कर्मचाऱ्यांची भरती करावी
  • राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आरएसएसवर बंदी आणावी

 

यासारख्या विविध मागण्या ऑल इंडिया उलेमा बोर्डाकडून महाविकास आघाडीकडे करण्यात आल्या आहेत. त्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंना पत्र लिहिण्यात आले आहे. राज्यात ३८ विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे मुस्लीम मतदारांची संख्या निर्णायक आहे. उलेमा बोर्डाच्या या मागण्यांवर महाविकास आघाडीनेही सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबत नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेत्यांसोबत आमची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेवर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे अशी माहिती ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे महाराष्ट्र चेअरमन नायब अन्सारी यांनी माहिती दिली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेMuslimमुस्लीम