शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 16:16 IST

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती आखण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाचलं आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यामधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती आखण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या रणनीतीमध्ये समन्वय राखण्यासाठी विभागनिहाय निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना नियुक्त केले आहे.

काँग्रेसने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागनिहाय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये मुंबई आणि कोकण विभागाची जबाबदारी ही अशोक गहलोत आणि जी. परमेश्वरा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर विदर्भ विभागाची जबाबदारी भूपेश बघेल,चरणजीत सिंग चन्नी आणि उमंग सिंघर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मराठवाड्याची जबाबदारी सचिन पायलट आणि उत्तम कुमार रेड्डी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी टी. एस. सिंहदेव आणि एम. बी. पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी ही सईद नासीर हुसेन आणि डी. अनसुया सीताक्का यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने ४४ जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात  १३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता महाराष्ट्रात विधानसभेच्या अधिकाधिक जागा जिंकण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस