शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बहिणींना २,१०० रुपये देऊ; तर शेतकऱ्यांना कर्जमाफी, अजित पवार गटाचा मतदारसंघनिहाय जाहीरनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 06:42 IST

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाने विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा बुधवारी प्रसिद्ध केला. यामध्ये अकरा नवीन आश्वासने समाविष्ट केली आहेत.

 मुंबई - अजित पवार गटाने विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा बुधवारी प्रसिद्ध केला. यामध्ये अकरा नवीन आश्वासने समाविष्ट केली आहेत. पक्ष लढवत असलेल्या सर्व ५२ मतदारसंघांत एकाचवेळी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार, गोंदियामधून  खासदार प्रफुल्ल पटेल, नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होते, तर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला. 

जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन आहे, तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यात येणार आहे. भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २५ हजार प्रति हेक्टरी बोनस दिला जाणार आहे. शिवाय अडीच लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

याशिवाय प्रशिक्षणाद्वारे एक लाख विद्यार्थ्यांना मासिक दहा हजार रुपये स्टायपेंड देणार आहे. अंगणवाडी आणि आशा वर्कर कर्मचाऱ्यांना १५ हजार मासिक वेतन, सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देताना वीज बिल ३० टक्के कमी करण्याचे, तसेच वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला २,१०० रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात आहे.  

विरोधकांच्या ‘नरेटिव्ह’ची किंमत चुकवावी लागलीलोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून  संविधान बदलणार असल्याचा चुकीचा आरोप करत तसा ‘नरेटिव्ह’ पसरवला गेला होता. संविधानाबाबत असे कधीही घडणार नव्हते, घडणार नाही. संविधानाबाबत पंतप्रधानांपासून सर्वांना आदरच आहे. परंतु, त्या ‘नरेटिव्ह’ची मोठी किंमत आम्हाला चुकवावी लागली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. 

एकत्र दिसणार नाही...मतदानाला १४ दिवस राहिले आहेत. त्यामुळे महायुतीच्या आम्हा तिघा प्रमुख नेत्यांना वेेगवेगळ्या सभांना जावे लागणार आहे. त्यामुळे उद्या आम्ही तिघे एकत्रित दिसणार नाही, त्यावेळी वेगळ्या बातम्या चालवू नका. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती एकोप्याने निवडणुकीला सामाेरी जाणार आहे, असेही पवार म्हणाले. 

३६ पानांचा जाहीरनामाराष्ट्रवादी काँग्रेसकडून ३६ पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ असे छापण्यात आले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार