शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Maharashtra Assembly Election 2019 : ... म्हणून मी भाजपाला पाठिंबा दिला, उद्धव ठाकरेंनी सांगितलं 2014 चं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 10:41 PM

Maharashtra Assembly Election 2019 : मी दोस्ती दिलखुलास होऊन करतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना टोला लगावला

ठाणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील सभेत बोलताना पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा 122 जागा जिंकला होता. त्यावेळी, अदृश्य हात पुढे आले, असे म्हणत शरद पवारांना टोला लगावला. त्यावेळी, आम्ही भाजपला पाठिंबा दिला नसता तर, हलं-डुलं अस्थिर सरकार राहिल असत. सरकारशी मी कधीही दगा-फटका केला नाही. शिवसेनेमुळेच सरकार स्थिर राहिलं, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.  

मी दोस्ती दिलखुलास होऊन करतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना टोला लगावला. तसेच, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी  सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी मी कधीही विरोध केला नाही, भारतरत्न देण्यासाठी एका समिती गठीत केलेली असते, त्या समितीचा हा निर्णय असतो, असे सिंग यांनी म्हटले होते. उद्धव यांनी सिंग यांच्या मुद्द्याला स्पर्श करताना, सावरकरांना नाही, तर कोणाला भारतरत्न द्यायचा? असे म्हणत कोणत्या वृत्तीकडे राज्य द्यायचे हा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला राम मंदिर हवे आहे. शिवशाही म्हणजे गोरगरीबांना सुखाचे क्षण देणारे राज्य हवे रामराज्य हवे. त्यांच्याप्रमाणे न्यायाने राज्य करायचे आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. समोर लढण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिल्लक राहिलेली नाही. त्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती शिरल्याने काँग्रेसची ही परिस्थिती आली आहे. स्वातंत्र्यांच्या पूर्वी केवळ काँग्रेस या लढयात सहभागी झाले होते. पण, तो जमाना आता गेला आहे

गांधी टोपी असणारा विश्वासघात करीत नाहीत असा विश्वास काँग्रेसवर होता. पण, त्यानंतर सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण सुरु केले. कँग्रेसवाले विसरले की देश म्हणजे केवळ भूखंड नाही. तर लोकांच्या इच्छेवर चालणारा देश असतो. विरोधक समोर नसल्याने डोक्यात मस्ती शिरु देऊ नका. जगभर मंदीचा विळखा पडतो आहे. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, घरगुती वीज दर तीनशे युनिटपर्यंतचा दर कमी करणार, शेतकऱ्यांना कमी दरात वीज देणार, आपले सरकार म्हणजे लोकांना असलेली आशा आहे, असे म्हणत वचननामा पूर्ण करणार असल्याचे ठाकरेंनी म्हटले. 

भगवा म्हणजे धगधगती मशाल आहे, युती घट्ट पाहिजे. युतीबाबत अपप्रचार होत आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोणत्याही बंडखोराला थारा देणार नाहीत. शिवसेनाप्रमुखाचा मुलगा म्हणून सत्तेला बांधील नाही, गेलेली सत्ता शिवसैनिकांमूळे पुन्हा खेचून आणली आहे. मराठवाडा आणि विर्दभात उन्हात लोक येऊन सभेला बसत असतात. आई वडिलांची पुण्याई असल्याने ही लोक येत असतात. ठाणे वाढते आहे, ठाणे मोठे होत असताना वेगळे धरण का नसावे. काळू धरणाचा पाठपुरावा सुरु आहे. काळू धरण आता झाल्यातच जमा आहे. शहर तर आपण जिंकणार आहोत, जिल्ह्यातील मुंब्रा-कळव्यासह अठरा विधानसभा जागा जिंकणार, असे म्हणत उद्धव यांनी ठाण्यातील स्थानिक प्रश्नावरही भाष्य केलं. दिपाली सय्यद शिवसैनिकांची मुलगी आहे त्या स्वतःहून काम करीत आहेत, असेही उद्धव यांनी म्हटले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019