शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा 'दस का दम'; राज ठाकरेंच्या इंजिनाला इंधन देणारे आकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 21:11 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधारी पक्षाची काहीशी निराशा करणारे तर विरोधी पक्षांचे मनोबल वाढवणारे ठरले आहेत.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधारी पक्षाची काहीशी निराशा करणारे तर विरोधी पक्षांचे मनोबल वाढवणारे ठरले आहेत. एकीकडे भाजपा आणि शिवसेना महायुतीची सत्ता आली तरी त्यांचे सभागृहातील संख्याबळ घटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे संख्याबळ बऱ्यापैकी वाढले आहे. राज ठाकरे यांच्या मनसेसाठीही ही निवडणूक किंचीत दिलासा देणारी ठरली आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील यांच्या रूपात मनसेचा आमदार विधानसभेत पोहोचला आहे. सोबतच इतर काही ठिकाणी मिळालेली मते मनसेचा आत्मविश्वास वाढवणारी आहेत. मनसेला केवळ एका जागेवर विजय मिळाला असला तरी राज्यातील अन्य काही मतदारसंघात मनसेचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले आहेत. संतोष नलावडे (शिवडी), संदीप देशपांडे (माहीम), नयन कदम (मागाठाणे), संदीप जळगावकर (भांडूप पश्चिम) हर्षला चव्हाण (मुलुंड प.), अविनाश जाधव (ठाणे), मंदार हळबे (डोंबिवली) शुभांगी गोवरी (भिवंडी ग्रामीण), किशोर शिंदे (कोथरूड) या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्याबरोबरच काही मतदारसंघात मनसेचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले. 

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत. दरम्यान, निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेच्या चढाओढीवरून कुरघोडी सुरू झाली आहे. तसेच शिवसेना भाजपाला सत्तावाटपाच्या ५०-५० फॉर्म्युल्याची सतत आठवण करून देत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे