शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगार साहित्य वाटपात गोंधळ आणि गैरव्यवहाराचे आरोप, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:53 IST

Maharashtra Assembly Budget Session 2026: अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्याचे वाटप करताना उडालेला गोंधळ आणि कामगार विभागातील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

मुंबई - अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्याचे वाटप करताना उडालेला गोंधळ आणि कामगार विभागातील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विशेषतः एका अधिकाऱ्याला मिळत असलेली नियमबाह्य मुदतवाढ यावर लक्षवेधीच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले.

कामगारांचे साहित्य वाटप याबाबत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कामगार विभागाला असे साहित्य वाटप करण्याचे अधिकार आहेत का? हा निधी बांधकाम कामगारांचा असून त्याचा विनियोग योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

यवतमाळच्या पुसद आणि दारव्हा येथे साहित्य घेण्यासाठी कामगारांची प्रचंड झुंबड उडाली होती. ५० हजार कामगार नोंदणीकृत असताना केवळ ३ हजार लोकांना ऑनलाइन वेळ देण्यात आली, ज्यामुळे व्यवस्थेचे वाभाडे निघाले. अधिकारी विवेक कुंभार यांच्यावर प्रचंड कमिशनखोरी आणि गैरव्यवहाराचे आरोप करत, त्यांचा कार्यकाळ संपूनही त्यांना दोन-दोन वर्षे मुदतवाढ कोणाच्या आशीर्वादाने मिळत आहे, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

जुलै २०२५ पासून वारंवार मागणी करूनही अद्याप कामगारांची नेमकी संख्या, साहित्याचा एकूण खर्च आणि लाभार्थ्यांची जिल्हानिहाय माहिती सरकारने दिलेली नाही, अस वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. दलालांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती लाभार्थी नोंदणी आणि वाटपावर देखरेख ठेवेल,अस मंत्री यांनी प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतलेल्या अधिकारी कुंभार यांच्या मुदतवाढीचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावरचा असल्याचे सांगत, तक्रारींची दखल घेऊन उचित चौकशी करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी सभागृहात दिले.   

English
हिंदी सारांश
Web Title : Construction worker material distribution scam: Opposition corners government.

Web Summary : Opposition accuses government of irregularities in construction worker material distribution. Congress alleges fund misuse and favoritism towards an officer. Minister assures investigation and MLA oversight committees.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVidhan Bhavanविधान भवनcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी