महाराष्ट्रात गतवर्षी 3,228 शेतक-यांची आत्महत्या, 14 वर्षातील सर्वात जास्त आत्महत्या

By Admin | Updated: March 4, 2016 18:01 IST2016-03-04T18:01:49+5:302016-03-04T18:01:49+5:30

महाराष्ट्रात गेल्या वर्षी 3,228 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 14 वर्षातील आत्महत्येचा हा सर्वात जास्त आकडा आहे

In Maharashtra, 3,228 farmers committed suicides last year, the highest number of suicides in 14 years | महाराष्ट्रात गतवर्षी 3,228 शेतक-यांची आत्महत्या, 14 वर्षातील सर्वात जास्त आत्महत्या

महाराष्ट्रात गतवर्षी 3,228 शेतक-यांची आत्महत्या, 14 वर्षातील सर्वात जास्त आत्महत्या

>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ४ - महाराष्ट्रात गेल्या वर्षी  3,228 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 14 वर्षातील आत्महत्येचा हा सर्वात जास्त आकडा आहे. 2001 पासून आतापर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्यांमधील हा आतापर्यंतचा हा सर्वात जास्त आकडा आहे . राज्यसभेत लिखीत उत्तर देताना राधामोहन सिंग यांनी ही माहिती दिली आहे.
 
औरंगाबादमध्ये सर्वात जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. आकडेवारीनुसार औरंगाबादमध्ये 1130, अमरावती 1179, नाशिक 459, नागपूर 362, पुणे 69 आणि कोकणात 2 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार शेतक-यांची आत्महत्या रोखण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत असल्याची माहितीही राधामोहन सिंग यांनी दिली आहे.  
 
आत्महत्या केलेल्यांपैकी 1,841 कुटुंब मदतीसाठी पात्र आहेत. तर 903 कुटुंब अपात्र असून 484 प्रकरणी चौकशी सुरु आहे. आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबाला 1 लाखाची मदत देण्यात आल्याचं राधामोहन सिंग यांनी सांगितलं आहे. दुष्काळाशी सामना करण्यासाठी केंद्राने 3,049.36 करोडचा मदतनिधी मंजूर केला गेला असल्याची माहिती केंद्र आणि राज्य सरकार शेतक-यांची आत्महत्या रोखण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत असल्याची माहितीही राधामोहन सिंग यांनी दिली आहे. 
 

Web Title: In Maharashtra, 3,228 farmers committed suicides last year, the highest number of suicides in 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.