धोका वाढला! महाराष्ट्रात पहिल्यांदाच ३१,८५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; मुंबईत ५ हजारांवर नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 09:17 PM2021-03-24T21:17:29+5:302021-03-24T21:22:55+5:30

कोरोनाची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद

maharashtra 31855 new corona virus cases recorded in Maharashtra for the first time Over 5000 new patients in Mumbai | धोका वाढला! महाराष्ट्रात पहिल्यांदाच ३१,८५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; मुंबईत ५ हजारांवर नवे रुग्ण

धोका वाढला! महाराष्ट्रात पहिल्यांदाच ३१,८५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; मुंबईत ५ हजारांवर नवे रुग्ण

Next
ठळक मुद्देकोरोनाची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंदकेवळ मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पहिल्यांदाच राज्यात सर्वाधिक म्हणजेच ३१ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे केवळ मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मंगळवारी राज्यात २८ हजार ६९९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर सोमवारी राज्यात २४ हजार ६४५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 

गेल्या चोवीस तासांत राज्यात ३१ हजार ८५५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ९५ रुग्णांच्य़ा मृत्यूची नोंद करण्यात आली. तर गेल्या २४ तासांमद्ये १५ हजार ०९८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत २५ लाख ६४ हजार ८८१ लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी २२ लाख ६२ हजार ५९३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ५३ हजार ६८४ रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात एकूण २ लाख ४७ हजार २९९ अॅक्टिव्ह केसेस आहेत.





कोरोना महासाथीपासून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ

गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, ही सर्वाधिक रुग्णवाढ असून कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. सध्या मुंबई एकून ३० हजार ७६० अॅक्टिव्ह केसेस असून रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के इतका आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत २ हजार ०८८ रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं असून रुग्ण दुपटीचा कालावधी ८४ दिवस असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. 

Read in English

Web Title: maharashtra 31855 new corona virus cases recorded in Maharashtra for the first time Over 5000 new patients in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.