शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

४ तास थांबवून ठेवलं अन्...; बंजारा समाजाचे महंत शिवबंधन बांधणार, संजय राठोडांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 07:48 IST

राजकीय मैदानात माझे आणि संजय राठोड यांचे संबंध राहणार नाही असं महंत सुनील महाराजांनी स्पष्ट केले.

मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून चर्चेत असलेले तत्कालीन शिवसेना नेते आणि सध्याचे शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसणार आहे. बंजारा समाजाचा चेहरा म्हणून राठोडांकडे पाहिले जात होते. परंतु आता राठोडांनाच टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती. अखेर महंतांनी स्वत: हा खुलासा केला आहे. 

महंत सुनील महाराज हे शिवबंधन बांधणार असल्याचं समोर आले आहे. याबाबत स्वत: महंतांनी स्पष्टीकरण दिले आहे. महंत सुनील महाराज म्हणाले की, बंजारा समाजाचे प्रश्न घेऊन, समाजहिताचे प्रश्न, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासाचे प्रश्न घेऊन मुंबईत गेलो असता बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेलो तिथे मिळालेली वागणूक ही न सांगण्यासारखी आहे. मला त्या कार्यालयात ४ तास थांबवून ठेवले. त्यानंतर भेट झाल्यानंतर मंत्र्यांनी १० मिनिटेही वेळ दिला नाही. त्यांच्या देहबोली आणि वृत्तीवरून माझी उपस्थिती त्यांना खटकत असल्याचं दिसून आले असं त्यांनी सांगितले. 

तसेच ज्यांच्यासाठी आपण सहकार्य केले, यानंतर माझे सामाजिक, धार्मिक कार्यात माझे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. परंतु राजकीय मैदानात माझे आणि संजय राठोड यांचे संबंध राहणार नाही. बंजारा समाजासाठी, सत्तेत वाटा मिळण्यासाठी, बहुजन आणि बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व विधानसभेत करण्यासाठी मी शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहे असं महंत सुनील महाराज यांनी म्हटलं. 

बंजारा वोट बँक शाबूत ठेवण्याचे आव्हानशिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर, राज्यातील बंजारा वोट बॅंक शाबूत ठेवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू आहे. नुकतेच शिवसेनेच्या नेत्यांनी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा धर्मगुरू संत बाबुसिंग महाराज यांच्यासह संत-महंतांची भेट घेत चर्चा केली होती. बंजारा संत, महंतांची भेट घेण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे पोहरादेवीत जाणार असल्याचंही समोर आले होते. त्यानंतर आता बंजारा समाजाचे महंत हाती शिवबंधन बांधणार असल्याने मंत्री संजय राठोड यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे