महाड दुर्घटना - १०० किलोमीटरवर सापडले आणखी २ मृतदेह
By Admin | Updated: August 20, 2016 15:57 IST2016-08-19T18:32:02+5:302016-08-20T15:57:59+5:30
महाड दुर्घटनेतील आणखी २ मृतदेह दुर्घटनास्थळापासून १०० किलोमीटर अंतरावर आढळले.

महाड दुर्घटना - १०० किलोमीटरवर सापडले आणखी २ मृतदेह
ऑनलाइन लोकमत
महाड, दि. १९ : महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून दोन एसटी बस व काही छोट्या गाड्या वाहून गेल्या होत्या. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा रोज वाढतचं आहे. यामधील ३ मृतदेह आज हाती लागले आहेत. यामधील २ मृतदेह हे दुर्घटनेपासून १०० किलोमीटर अंतरावर अाढळले आहेत. दापोलीतील केळशी वेळास किनाऱ्यावर खाजण जमिनिमध्ये हे दोन्ही मृतदेह सापडले आहेत. महाड दुर्घटनेतील मृत्यूचा आकडा ३२ वर पोहचला आहे.
महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून दोन एसटी बस व काही छोट्या गाड्या वाहून गेल्या होत्या. त्यापैकी एका बसचा शोध लागला होता मात्र दुस-या बसचा शोध लागत नव्हात. 13 ऑगस्ट रोजी दुस-या बसचाही अखेर शोध लागला, पूलासापून ५०० मीटर अंतरावर नौदलाच्या जवानांना ही बस सापडली. दुर्घटनेतील राजापूर-बोरीवली एसटी दुर्घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर सापडली होती.