शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

MNS Raju Patil: मनसेच्या एका मतासाठी मविआ आणि भाजपाची फिल्डिंग, फोन खणाणले!; राजू दादा म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 13:47 IST

राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. १० जागांसाठी ११ उमेदवर रिंगणात असल्यानं दहाव्या जागेवर चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

मुंबई-

राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. १० जागांसाठी ११ उमेदवर रिंगणात असल्यानं दहाव्या जागेवर चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या लढाईत छोटे पक्ष, अपक्षांच्या मताला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) एका मतासाठी भाजपासोबतच महाविकास आघाडीनं देखील फिल्डिंग लावल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी झालेल्या पराभवाचा धसका महाविकास आघाडीनं घेतला असून यावेळी ठाकरे सरकारकडून राजू पाटील यांनाही मतदानासाठी गळ घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण ग्रामीणचे मनसचे आमदार राजू पाटील यांना आपल्या बाजूनं घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपा नेत्यांची फोनाफोनी सुरू आहे. विधान परिषद निवडणूक मतदानाचे LIVE UPDATES येथे क्लिक करा

मनसेचे आमदार राजू पाटील मतदानासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना देखील झाले आहेत. मतदानाला निघण्याआधी राजू पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना महत्वाचं विधान केलं. "मागील निवडणुकीत एकेक मताची किंमत सर्वांना कळाली आहे. आम्ही व्यक्ती बघूनच मागच्यावेळी मतदान केलं होतं. तशी विनंती राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांच्या आदेशानुसारच मी मतदान केलं होतं. काल रात्री मी राज ठाकरेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसारच मी मतदान करणार आहे", असं राजू पाटील म्हणाले. 

भाजपासोबतच शिवसेना अन् काँग्रेसकडूनही विचारणाराज्यसभा निवडणुकीवेळी भाजपाकडून मनसेच्या मताला साद घालण्यात आली होती. पण यावेळी भाजपासोबतच शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनीही गळ घातल्याची माहिती खुद्द राजू पाटील यांनी यावेळी दिली. "मागच्या वेळी फक्त भाजपाकडून विचारणा झाली होती. यंदा मात्र शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांकडूनही विचारणा झाली होती. छोट्या पक्षांचं किती महत्व आहे हे या निवडणुकीनं दाखवून दिलं आहे. मी ज्या उमेदवाराला मत देणार तो निवडून येणारच", असं राजू पाटील म्हणाले.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकMNSमनसेRaju Patilराजू पाटीलRaj Thackerayराज ठाकरे