शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

संपूर्ण देशात चालणार चिकित्सेचा महाकुंभ, आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह १८ सप्टेंबरपासून  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 04:29 IST

संपूर्ण देशात नि:शुल्क चिकित्सेच्या महाकुंभाच्या रूपात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा केला जाणार आहे. देशातील सर्व प्रमुख संस्थांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅक्युप्रेशर, सुजोक, शिआत्सू, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी आदी चिकित्सा पद्धतींच्या चिकित्सकांच्या सहकार्याने हे अभियान संपूर्ण देशात १८ ते २४ सप्टेंबरदरम्यान चालणार आहे.

 औरंगाबाद : संपूर्ण देशात नि:शुल्क चिकित्सेच्या महाकुंभाच्या रूपात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा केला जाणार आहे. देशातील सर्व प्रमुख संस्थांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅक्युप्रेशर, सुजोक, शिआत्सू, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी आदी चिकित्सा पद्धतींच्या चिकित्सकांच्या सहकार्याने हे अभियान संपूर्ण देशात १८ ते २४ सप्टेंबरदरम्यान चालणार आहे. याअंतर्गत सर्व चिकित्सक प्रत्येक दिवशी दोन तास आपल्या केंद्रांमध्ये नि:शुल्क चिकित्सा करतील.दोन वर्षांपूर्वी या महाअभियानास लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला. या नि:शुल्क सेवा सप्ताहाचे उद्घाटन १८ सप्टेंबर रोजी राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते आणि खा. चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत होईल. संयोजक जेआर अनिल जैन यांनी सांगितले की, भारतीय जीवन पद्धतीचे विकसित रूप रिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅक्युप्रेशरसंदर्भात स्थानिकस्तरापासून विश्वस्तरापर्यंत जागरूकता झाली आहे.या सात दिवसांत स्थानिक पातळीवर अ‍ॅक्युप्रेशर चिकित्सक शिक्षण संस्था व्यावसायिक संस्थांत नि:शुल्क कार्यशाळेचे आयोजन करतील.अ‍ॅक्युप्रेशर ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी आॅर्गनायझेशन, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ होलिस्टिक सायन्स, भारतीय अ‍ॅक्युप्रेशर योग परिषद, बिहार अ‍ॅक्युप्रेशर योग कॉलेज, आॅल इंडिया असोसिएशन आॅफ अ‍ॅक्युप्रेशर रिफ्लेक्सोलॉजी, सायंटिफिक इन्स्टिट्यूट आॅफ अल्टरनेटिव मेडिसिन अ‍ॅण्ड पॅरामेडिकल सायन्स कौन्सिल, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग अ‍ॅण्ड ट्रिटमेंट, विश्व चैतन्य अ‍ॅक्युप्रेशर थेरपी फाऊंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, नेचर केअर थेरपिस्ट असोसिएशन आदी संस्थांच्या सहकार्याने प्रत्येक दिवशी दोन तास नि:शुल्क चिकित्सेचे आयोजन करण्यात येणार आहे.या सर्व कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय स्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ होलिस्टिक सायन्सचे अध्यक्ष डॉ. पी. बी. लोहिया, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष अनंत बिरादर, भारतीय अ‍ॅक्युप्रेशर योग परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्वदेव प्रसाद गुप्ता, आॅल इंडिया असोसिएशन आॅफ अ‍ॅक्युप्रेशर रिफ्लेक्सोलॉजीच्या अध्यक्षा डॉ. कुसुम अग्रवाल व सहसंयोजक डॉ. दिलीप कुमार उरनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तिसरी अखिल भारतीय सभा मुंबईतअ‍ॅक्युप्रेशर, रिफ्लेक्सोलॉजी, सुजोक, शिआत्सू, जैन रिफ्लेक्सोलॉजी चिकित्सा पद्धतींच्या चिकित्सकांची तिसरी अखिल भारतीय सभा २४ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. याप्रसंगी देशातील प्रमुख चिकित्सक आपल्या अनुसंधानात्मक कार्यांचे सादरीकरण करतील. याप्रसंगी तीन वर्षांपेक्षा अधिक चिकित्सा देणाºया चिकित्सकांचा सत्कार करण्यात येणार आहे.काय आहे रिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅक्युप्रेशर चिकित्सा पद्धतरिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅक्युप्रेशर याचा अर्थ आहे, अ‍ॅक्यू अर्थात तिखट. प्रेशर अर्थात दबाव आणि रिफ्लेक्स म्हणजे प्रतिबिंब. शरीरातील अवयवांचे प्रतिबिंब केंद्र जे की, हात-पाय, कान व चेहºयावर आहे. त्यांना विशेष प्रकारचा दबाव देऊन उपचार करण्याच्या उपचार पद्धतीस रिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅक्युप्रेशर म्हणतात.

टॅग्स :Healthआरोग्य