गिरणी कामगारांच्या घरांसाठी ११ मार्चला महा ‘जेल भरो’ आंदोलन

By Admin | Updated: February 10, 2016 04:33 IST2016-02-10T04:33:59+5:302016-02-10T04:33:59+5:30

गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर राज्य सरकारने चालढकल धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे कामगार वर्गात सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. याविरुद्ध गिरणी कामगार कृती

Maha 'Jail Bharo' movement for the workers of the mill workers on March 11 | गिरणी कामगारांच्या घरांसाठी ११ मार्चला महा ‘जेल भरो’ आंदोलन

गिरणी कामगारांच्या घरांसाठी ११ मार्चला महा ‘जेल भरो’ आंदोलन

मुंबई : गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर राज्य सरकारने चालढकल धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे कामगार वर्गात सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. याविरुद्ध गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने ११ मार्च
रोजी महाजेल भरो आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘महाजेल भरो आंदोलना’साठी कामगार संघटनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत गिरणगावात सर्वत्र सभा पार पडत आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत या सभा शहर-उपनगरातील विविध ठिकाणी होणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Maha 'Jail Bharo' movement for the workers of the mill workers on March 11