अखेर ‘माफसू’ला मिळणार नवे शास्त्रज्ञ!

By Admin | Updated: July 19, 2014 01:31 IST2014-07-19T01:28:33+5:302014-07-19T01:31:57+5:30

भरती घोटाळ्य़ानंतर प्रथमच होत आहे नोकरभरती

Mafsu will finally get a new scientist! | अखेर ‘माफसू’ला मिळणार नवे शास्त्रज्ञ!

अखेर ‘माफसू’ला मिळणार नवे शास्त्रज्ञ!

अकोला : संपूर्ण राज्यात गाजलेल्या भरती घोटाळ्य़ाच्या पार्श्‍वभूमीवर, तब्बल आठ वर्षांपासून कर्मचारी भरती बंद असलेल्या महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठ (माफसू)ला, अखेर कर्मचारी भरतीची परवानगी मिळाली असून, लवकरच विद्यापीठाला १५४ नवे शास्त्रज्ञ व अधिकारी मिळणार आहेत.
पशू, प्राण्यांशी निगडित विषयांवर संशोधन व सुक्ष्म अभ्यास करण्यासाठी, दहा वर्षांपूर्वी राज्यात ह्यमाफसूह्ण हे स्वतंत्र विद्यापीठ नागपूर येथे स्थापन करण्यात आले. या विद्यापीठामुळे नवे संशोधन करण्याच्या संधी शास्त्रज्ञांना मिळाल्या.
या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी, स्टेम सेल्स, रोगमुक्त जनावरे, तसेच नेमक्या आजारावर उपचार करणारी औषधी, इत्यादी विषयांमध्ये केलेली संशोधने मैलाचा दगड ठरली आहेत; मात्र विद्यापीठात २00८ मध्ये झालेल्या नोकरभरती घोटाळ्य़ामुळे विद्यापीठाची प्रतिमा चांगलीच मलीन झाली होती. जवळपास ४५0 पदांच्या भरतीमध्ये घोटाळा झाल्याने, शासनाने चौकशी समितीच्या अहवालानंतर त्या सर्व पदांवर झालेली भरती रद्द केली होती.
विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ. अरू ण निनावे यांच्यावर सदर घोटाळाप्रकरणी निलंबित होण्याची पाळी आली होती; तथापि उच्चस्तरीय चौकशीनंतर डॉ. निनावे यांचे निलंबन रद्द करण्यात आले होते.
दरम्यान, या विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे डॉ. आदित्यकुमार मिश्र यांनी हाती घेतल्यानंतर, नोकरभरती घोटाळ्यामध्ये दोष नसलेल्या काही शास्त्रज्ञ व अधिकार्‍यांना कामावर रू जू करू न घेण्यात आले होते. या प्रकरणामुळे पदोन्नती रखडलेल्या अनेकांना पदोन्नतीही देण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय विद्यापीठाला लागणारे पुरेपूर मनुष्यबळ विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्यामुळे, संशोधनासह विद्यापीठाच्या इतरही कामकाजावर प्रतिकुल परिणाम होत होता. विद्यापीठाला सुमारे १,५00 शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचार्‍यांची गरज असताना, प्रत्यक्षात पाचशेपेक्षा कमी कर्मचारी सद्य स्थितीत कार्यरत आहेत.
या पार्श्‍वभूमीवर, विद्यापीठाने नव्या पदांची मागणी सातत्याने रेटून धरली होती. ती अखेर मान्य झाली असून, शासनाने १५४ शास्त्रज्ञ भरतीची अनुमती विद्यापीठाला दिली आहे. भरतीची अनुमती मिळालेल्या पदांपैकी १00 पदे साहाय्यक प्राध्यपकांची असून, उर्वरित पदांमध्ये सहयोगी अधिष्ठाता व प्राध्यपक या पदांचा समावेश आहे.
विद्यापीठाला मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. शासनाने नवीन पदांच्या भरतीसाठी अनुमती दिली आहे. आम्ही १५४ पदे भरणार आहोत. त्यामुळे विद्यापीठाच्या कामाकाजाला गती मिळणार असल्याची माहीती महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संपत खिल्लारी यांनी दिली.

Web Title: Mafsu will finally get a new scientist!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.