मा. गो. वैद्यांकडून बंडखोर स्वयंसेवकांचे समर्थन

By Admin | Updated: February 7, 2017 19:47 IST2017-02-07T19:47:30+5:302017-02-07T19:47:30+5:30

मनपा निवडणुकांमध्ये भाजपाविरोधातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात खळबळ माजली आहे.

Ma Go Support for the rebel volunteers from the scientists | मा. गो. वैद्यांकडून बंडखोर स्वयंसेवकांचे समर्थन

मा. गो. वैद्यांकडून बंडखोर स्वयंसेवकांचे समर्थन

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 7 -  मनपा निवडणुकांमध्ये भाजपाविरोधातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात खळबळ माजली आहे. मात्र स्वयंसेवकांच्या या पावलाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दबक्या आवाजात समर्थनदेखील करत आहेत. संघाचे माजी प्रवक्ते व ज्येष्ठ विचारक मा. गो. वैद्य यांनीदेखील अप्रत्यक्षरीत्या या उमेदवारांचे समर्थनच केले आहे.

प्रत्येकाला मत देण्याचे स्वातंत्र असून एकाच राजकीय पक्षालाच स्वयंसेवकांनी मतदान करावे असे संघ सांगत नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. संघ स्वयंसेवक केवळ भाजपाशीच बांधील असतात, असा समज आहे. मात्र संघ स्वयंसेवकांची केवळ एकाच पक्षाशी बांधिलकी नाही. तसेच एकाच राजकीय पक्षाला मत द्यावे, असे संघ स्वयंसेवकांना सांगत नाही.

प्रत्येकाला मत देण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा स्थितीत संघाने कुणावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. स्वयंसेवक राजकारणात जाऊ शकतात. निवडणूक लढावी की नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

Web Title: Ma Go Support for the rebel volunteers from the scientists