अडीच लाखांचे कापड गठ्ठे ट्रकमधून लंपास
By Admin | Updated: July 27, 2016 17:39 IST2016-07-27T17:39:23+5:302016-07-27T17:39:23+5:30
कोंडाईबारी ते साक्री दरम्यान चालत्या ट्रकमधून अडीच लाख रुपये किंमतीचे कापडाचे गठ्ठे चोरटयांनी लांबविल्याची घटना घडली.

अडीच लाखांचे कापड गठ्ठे ट्रकमधून लंपास
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. २७ : कोंडाईबारी ते साक्री दरम्यान चालत्या ट्रकमधून अडीच लाख रुपये किंमतीचे कापडाचे गठ्ठे चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरातमधून मध्यप्रदेशकडे कापडाचे गठ्ठे घेवून जाणाऱ्या ट्रकमधून ही चोरी झाली. पोलीस सूत्रानुसार, धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाट ते साक्री दरम्यान ट्रक जात असतांना पहाटेच्या वेळी चोरट्यांनी चालत्या ट्रकवर चढून ट्रकची ताडपत्री कापून त्यातील कापडाचे दहा गठ्ठे चोरले. त्यांची किंमत दोन लाख ५० हजार ८६९ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत चालक नथनीराम नंदकिशोर यादव, रा.बक्सर, जि.सिमरी (बिहार) याने विसरवाडी पोलिसात फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या महामार्गावर चालत्या ट्रकमधून किंवा हॉटेलजवळ रात्री थांबलेल्या ट्रकमधून वस्तू चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत विसरवाडी पोलिसांन गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.