शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईसमोर मोठा पेच! LPG टंचाई, विवाहसोहळे पुढे ढकलावे लागणार; पंगती कशा उठवणार...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 10:39 IST

LPG Crisis Impacts Weddings Marathi: इस्रायल-ईराण युद्धामुळे भारतात कमर्शियल LPG टंचाई. लग्नसराईत गॅस उपलब्ध नसल्याने मंगल कार्यालयांसमोर पेच. पंगती कशा उठवणार? वाचा सविस्तर वृत्त.

आधीच सोन्याच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे लग्नाचे बजेट कोलमडलेले असताना, आता विवाहेच्छुकांसमोर 'LPG संकटाचे' नवीन संकट उभे राहिले आहे. इस्रायल-ईराण युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने लग्नाच्या पंगती कशा उठवणार? असा गंभीर प्रश्न मंगल कार्यालय आणि वधू-वर पित्यांसमोर उभा ठाकला आहे.

लग्नाचे जेवण बनवण्यासाठी मोठ्या आकाराच्या शेगड्या आणि कमर्शियल गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. एका मोठ्या लग्नात दिवसाला किमान २ ते ३ सिलिंडरची गरज भासते. मात्र, सध्या बाजारपेठेत कमर्शियल सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद झाल्याने केटरर्स आणि हॉल मालक हवालदिल झाले आहेत.

पाचशे-हजार पाहुण्यांच्या जेवणावळी कशा होणार?लग्नात सहसा ५०० ते १००० लोकांच्या जेवणावळी असतात. ८-१० पंगती उठवण्यासाठी गॅसची नितांत गरज असते. सध्याच्या परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेवण चुलीवर शिजवणे आता शक्य राहिलेले नाही, कारण शहरांमध्येच नाही तर गावातही सरपण (लाकूड) उपलब्ध नाही. व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलिंडर वापरणे बेकायदेशीर आहे, शिवाय त्याचा पुरवठाही मर्यादित आहे. 

तारीख पुढे ढकलण्याची भीतीजर गॅसची उपलब्धता झाली नाही, तर ऐन लग्नसराईत अनेक कुटुंबे लग्नसोहळे पुढे ढकलण्याच्या टेन्शनमध्ये आहेत. सोन्यानंतर आता गॅस टंचाईने विवाहेच्छुकांच्या तोंडचे पाणी पळवले असून, सरकार यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : LPG shortage threatens weddings, ceremonies may be postponed amid crisis.

Web Summary : Commercial LPG shortage due to the Israel-Iran conflict threatens wedding feasts. Caterers and families face difficulties. Postponements loom due to gas scarcity and high gold prices, leaving families anxious for a solution.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरmarriageलग्नWeddingशुभविवाहIranइराणWarयुद्धAmericaअमेरिका